Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या शोमध्ये सध्या अनेक घटना घडत आहेत. ‘दया भाभी’ परतणार असल्याच्या चर्चेमुळे प्रेक्षक देखील तिला पाहण्यासाठी आतुर झाले होते. मात्र, आता प्रेक्षकांची निराशा झाली आहे. दया भाभी अद्याप या शोमध्ये परतलेली नाही. दया नसल्याने निराश झालेल्या जेठालालच्या दुःखात आणखी भर पडली आहे. तसं, जेठालाल आणि नशीब यांचा मालिकेत अगदी 36चा आकडा आहे. त्याच्या आयुष्यात आनंदासोबतच दुःख देखील एकत्रच येतात. आता देखील असंच काहीसं घडलं आहे. पुन्हा एकदा, त्याचे बापूजी गायब झालव आहेत.


जेठालालच्या आयुष्यात नुकताच एक आनंदाचा प्रसंग आला होता. त्याचे ‘गडा इलेक्ट्रॉनिक्स’ हे दुकान पुन्हा तयार झाले आहे. त्याच्या उद्घाटनाची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, जेठालालसमोर आता नवे टेन्शन उभे राहिले आहे.


दया परतलीच नाही...


याआधी सुंदरलालने उद्घाटनाच्या वेळी दयाबेनसोबत मुंबईला पोहोचू असे आश्वासन दिले होते. पण, तसे झाले नाही. सुंदरलाल दयाला सोबत घेऊन मुंबईला आला नाही. दया या वेळीदेखील गोकुळधाम सोसायटीत पोहोचलेली नाही. यामुळे रागाच्या भरात जेठालालने सुंदरलालला अल्टिमेटम दिला आहे. दोन महिन्यांत दया न आल्यास अन्न-पाणी त्याग करणार असल्याचे त्याने सर्वांसमोर जाहीर केले आहे.


आता बापूजीही...


यातूनच जेठालाल सावरत होता की, आता त्याच्या समोर नवं टेन्शन उभं ठाकलं आहे. दुकानाच्या उद्घाटनाचा मुहूर्त टळत चालला असताना, बापूजी मात्र कुठेच सापडत नाहीयेत. मंदिरात जाण्यासाठी बाहेर पडलेले बापूजी अद्याप दुकानात पोहोचले नाहीत, त्यामुळे सोसायटीतील सगळेच आता घाबरले आहेत. बापूजी परत हरवले की, काय अशी भीती सगळ्यांनाच वाटत आहे.



आता जेठालाल यांच्या दुकानाचे उद्घाटन वेळेवर होणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, दुकानाचे उद्घाटन वेळेत झाले नाही तर, अशुभ होईल, असे सगळ्यानांच वाटत आहे. एका पंडितजींनी आधीच जेठालालला इशारा दिला होता की, उद्घाटन वेळेत झाले नाही, तर पुन्हा शुभ मुहूर्त नाहीत. अशा स्थितीत जेठालाल चिंतेत आहे. एकीकडे दुकानाची चिंता आहे, तर दुसरीकडे बापूजी हरवल्याची भीती वाटत आहे.


हेही वाचा :


Shailesh Lodha : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सोडल्यानंतर ‘या’ कार्यक्रमात दिसणार शैलेश लोढा, प्रोमो व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला!


TMKOC : ‘अरेच्चा! हे तर मला माहितच नव्हतं!’, शैलेश लोढांच्या शो सोडण्याच्या चर्चेवर ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांची पहिली प्रतिक्रिया


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : अखेर तो क्षण आला! ‘गोकुळधाम सोसायटी’मध्ये होणार ‘दयाबेन’ची वापसी!