Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरची  लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. या मालिकेत ‘तारक मेहता’ साकारणारे अभिनेता शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी हा शो सोडल्याची चर्चा सुरु आहे. तर, दुसरीकडे ‘बबिता’ साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) देखील मालिकेचा निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या सगळ्या चर्चा सुरु असतानाच मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक कलाकार मालिका सोडण्याच्या वाटेवर असताना आता मालिकेत ‘दया बेन’ची (Daya Ben) वापसी होणार आहे.


नुकत्याच रिलीज झालेल्या एका प्रोमोमधून चाहत्यांना ही आनंदाची बातमी देण्यात आली आहे. या प्रोमोत ‘दया बेन’ लवकरच ‘गोकुळधाम सोसायटी’मध्ये येणार असल्याचे बोलले गेले आहे. शोमध्ये ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर येणार आहे. आता पुन्हा दयाबेनची पावले गोकुळधाममध्ये पडणार असून, गरबा क्वीन मालिकेत परतणार आहे.


पाहा प्रोमो :



दिशा वाकाणी परतणार?


अभिनेत्री दिशा वाकाणी हिने या मालिकेत ‘दया भाभी’ची भूमिका साकारली होती. आता मालिकेत दया परतणार म्हटल्यावर चाहत्यांना आणि प्रेक्षकांना तिचीच आठवण आली आहे. दिशा वाकाणी परतणार का?, असा प्रश्न विचारला असता मेकर्स म्हणाले की, मालिकेत दया परतणार आहे. मात्र, दिशा परत येणार का हे माहित नाही. दिसणे ही भूमिका गाजवली. पण, आता तिचे लग्न झाले आहे. तिला मुलं आहे. प्रत्येकाला आपापली जबाबदारी पार पडायची असते. त्यामुळे दिशा परतणार का? हे आम्ही सांगू शकत नाही. मात्र, ‘दया बेन’ मालिकेत परतणार आहे आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.


अभिनेत्री दिशा वाकाणी 2017मध्ये प्रसूती रजेवर गेली होती. मात्र, त्यानंतर ती शोमध्ये परतलीच नाही. शोच्या निर्मात्यांनी तिच्या जागी नवी अभिनेत्री शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ते अयशस्वी ठरले. त्यामुळे आता दिशाऐवजी ‘दया बेन’च्या अवतारात कोणती अभिनेत्री येणार आणि चाहत्यांकडून तिला कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


 हेही वाचा :


Shailesh Lodha : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सोडल्यानंतर ‘या’ कार्यक्रमात दिसणार शैलेश लोढा, प्रोमो व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला!


TMKOC : ‘अरेच्चा! हे तर मला माहितच नव्हतं!’, शैलेश लोढांच्या शो सोडण्याच्या चर्चेवर ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांची पहिली प्रतिक्रिया