Anil Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. अनिल यांचा जुग जुग जियो (Jug Jugg Jeeyo) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवन (Varun Dhawan), कियारा आडवाणी (Kiara Advani)आणि नीतू कपूर (Neetu Kapoor) हे कलाकार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या या चित्रपटाची टीम चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. नुकतीच या चित्रपटाच्या कलाकारांनी सुपरस्टार सिंगर 2 या शोमध्ये हजेरी लावली. या शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अनिल कपूर हे त्यांच्या आईच्या आठवणीत भावूक झालेले दिसत आहेत.
सुपरस्टार सिंगर 2 या शोमधील मणी या स्पर्धकानं क्या हुआ तेरा वादा हे गाणं गायलं. मणीचे हे गाणं ऐकून अनिल कपूर यांनी त्यांच्या आईची आठवण आली. त्यांनी सांगितलं की, 'माझ्या आईनं माझ्यासाठी कपडे शिवले तू जसा टी-शर्ट आणि पँट घातला आहे. तसेच कपडे माझ्या आईनं माझ्यासाठी शिलाई मशिनवर शिवले.' अनिल कपूर मणीला म्हणाले की, तू देखील खूप पुढे जा. त्यानंतर वरुण, कियारा यांनी अनिल कपूर यांनी मिठी मारली.
तेजाब,बेटा, विरासत, ताल, पुकार, नो एन्ट्री यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये अनिल कपूर यांनी काम केले आहे. त्यांच्या राम लखन, जुदाई,नायक, दिल धड़कने दो, वेलकम या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. ‘हमारे तुम्हारे’या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘हम पांच’आणि‘शक्ति’या चित्रपटांमध्ये सपोर्टिंग रोल अनिल यांनी केला. अनिल कपूर यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या आगामी चित्रपटाची त्यांचे चाहते उत्सुकतेने वाट बघतात.
जुग जुग जियो हा चित्रपट 24 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये वरुण सूद देखील काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं आहे. तसेच धर्मा प्रोडक्शन, वायकॉम 18 यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
हेही वाचा :