Swayamvar Mika Di Vohti : बॉलिवूड गायक मिका सिंह (Mika Singh) त्याच्या लग्नासाठी उत्सुक आहे. त्यामुळे त्याचे कुटुंबिय, मित्र आणि चाहते आनंदी झाले आहेत. मिका सिंहचा 'स्वयंवर मीका दी वोटी' (Swayamvar Mika Di Vohti) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमामुळे तरी मिकाला आयुष्याचा जोडीदार मिळेल अशी चाहत्यांकडून आशा व्यक्त केली जात आहे. 

Continues below advertisement


'स्वयंवर मीका दी वोटी' कधीपासून होणार सुरू?


'स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. अशातच या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाल्यामुळे प्रेक्षक आता या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा कार्यक्रम 19 जून 2022 पासून स्टार भारतवर रात्री आठ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लोकप्रिय गायक शान (Shaan) हा कार्यक्रम होस्ट करणार आहे. 


दलेर मेहंदी आणि कपिल शर्मा प्रीमियरला लावणार हजेरी


काही दिवसांपूर्वी मिका सिंहच्या 'स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मिका सिंहच्या 'स्वयंवर मीका दी वोटी'च्या प्रीमिअरला दलेर मेहंदी आणि कपिल शर्मा धमाल, मजा, मस्ती करताना दिसणार आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये दलेर मेहंदी म्हणतो आहे,"मिकाला डजनभर मुलं व्हावी."






किती मुली होणार सहभागी


'स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात 12 मुली सहभागी होणार आहेत. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची प्रेयसी म्हणून निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या होत्या. 12 मुलींमधून मिका जोडीदार म्हणून कोणाची निवड करणार हे पाहणं मनोरंजक असणार आहे. 


संबंधित बातम्या


Suchitra Krishnamoorthi : 'लेकीनं डेटिंग साईटवर टाकली प्रोफाईल अन्...'; सुचित्रा कृष्णमूर्तीने केला गौप्यस्फोट


B Praak Baby Death : "वडील म्हणून दु:ख वाटतयं...", बाळाचा जन्मत: मृत्यू झाल्यानंतर गायक बी प्राकची भावूक पोस्ट