Taapsee Pannu : 'असं करु नका'; फोटोग्राफर्सवर पुन्हा संतापली तापसी
नुकताच तापसीचा (Taapsee Pannu) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की तापसी ही फोटोग्राफर्सवर भडकली आहे.
Taapsee Pannu : तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तापसी ही वेगवेगळ्या विषयांवर तिचं मत मांडत असते. तापसी ही लोकांनी विचारलेल्या प्रश्नाला भन्नाट आणि मजेशीर पद्धतीनं उत्तर देते. अनेक वेळा तापसी फोटोग्राफर्सला खडे बोल सुनावते. आता पुन्हा तापसी फोटोग्राफर्सवर भडकली आहे. नुकताच तापसीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की तापसी ही फोटोग्राफर्सवर ओरडत आहे.
तापरसीचा व्हिडीओ व्हायरल
एका इंस्टाग्राम पेजनं तापसी पन्नूचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, एका बिल्डिंगमधून बाहेर आल्यानंतर तापसी कारमध्ये बसून पापाराझीशी बोलू लागते. पण, फोटोग्राफर्समुळे तिला गाडीचे दार बंद करता येत नाही. मग अचानक तापसीला राग येतो आणि ती फोटोग्राफर्सला म्हणते, 'असं करु नका' ती हे वाक्य सतत म्हणते.
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
तापसीच्या व्हायरल व्हिडीओला अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरनं कमेंट केली, मला ही आधी आवडत होती पण आता आजिबात आवडत नाही. तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'ही सध्या अशी का वागते, म्हणजे आधी तापसीला एवढा राग येत नव्हता.'
View this post on Instagram
याआधी देखील काही वेळा तापसी फोटोग्राफर्सवर भडकली आहे. त्यामुळे अनेक जण सध्या तिला ट्रोल करत आहेत. तापसी पन्नूने 2012 साली 'चश्मे बद्दूर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिच्या सांड की आंख, बदला, जुडवा 2 आणि बेबी या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. तापसीचा ब्लर हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Taapsee Pannu : 'माझ्यासोबत निट बोला'; फोटोग्राफर्स अन् तापसीमध्ये तूतू-मैंमैं