Swayamvar Mika Di Vohti : ‘स्वयंवर : मिका दी वोटी’ या कार्यक्रमामधून, प्रसिद्ध गायक मिका सिंह (Mika Singh) त्याच्या भावी पत्नीचा शोध घेत आहे. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये मिका सिंहने एक स्पर्धक तरुणीला सांगितले की, तो तिच्यामध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीला (Shweta Tiwari) पाहतो. मिका म्हणाला की, तो स्पर्धक चंद्राणी दासमध्ये टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची झलक पाहतो. श्वेता तिवारीच्या फोटोंसोबत चंद्राणीसचे फोटो पाहिले तर, अगदी चाहतेही अवाक् होतील. त्या दोघी खूप सारख्या दिसतात.


या एपिसोडमध्ये मिका सिंहसाठी, दिव्यांका त्रिपाठीने सर्व स्पर्धकांसोबत स्पीड डेटिंग राऊंड आयोजित केला होता, ज्यामध्ये मिका कोलकाताहून आलेल्या स्पर्धक चंद्राणी दासला भेटला आणि आपल्या मनातील गोष्टी बोलून दाखल्या आणि खूप काही गोष्टी सांगितल्या. यावेळीच त्याने म्हटले की, ती टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीसारखी दिसते.


चंद्राणीही मिकाच्या प्रेमात!


चंद्राणी आणि मिकाच्या स्पीड डेटिंग दरम्यान, चंद्राणी सांगितले की या काळात तिला कमी बोलायचे आहे आणि मिकाकडून खूप काही ऐकायचे आहे. हे ऐकल्यानंतर मिकाने सांगितले की, मी आधीच बोललो की, तू खूप सुंदर आहेस. मी तुला म्हणालो की, तू अगदी श्वेता तिवारीसारखी दिसतेस, ती माझी खूप आवडती आहे.


मिकाच्या स्वयंवरात सहभागी झालेली चंद्राणी व्यवसायाने अभिनेत्री आणि निर्माती आहे. सुरुवातीला खूप लाजाळू असलेल्या चंद्राणीने नंतर सांगितले की, ती आयुष्यातील आर्थिक संकटाला कशी सामोरी गेली आणि तिचे कुटुंब अनेक अडचणीतून कशाप्रकारे बाहेर आले. तिने आयुष्यात आर्थिक स्थैर्य मिळविण्यासाठी कसे कष्ट घेतले हे सांगितले. चंद्राणीला चित्रकलेची आवड आहे. मिकाशी झालेल्या संभाषणात तिने सांगितले की, ती इतरांप्रमाणे नाचू, गाऊ आणि मनोरंजन करू शकत नसेल, परंतु कुटुंबाला एकत्र बांधून कसे ठेवायचे हे तिला माहित आहे.


12 मुलींमधून मिका करणार एकीची निवड


‘स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात 12 मुली सहभागी झाल्या होत्या. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची जोडीदार म्हणून निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या होत्या. 12 मुलींमधून मिका जोडीदार म्हणून कोणाची निवड करणार हे पाहणं मनोरंजक असणार आहे.


हेही वाचा:


Swayamvar Mika Di Vohti : मिका सिंहच्या स्वयंवरमध्ये मराठी विनोदवीरांच्या मुलीचा सहभाग; ध्वनी पवार बाजी मारणार का?


Swayamvar Mika Di Vohti : घोड्यावर बसून आलेल्या मिका सिंहने जिंकलं तरुणीचं मन, ‘गब्बर’ बनून केलं मनोरंजन!