Bigg Boss OTT : लवकरच 'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT ) हा कार्यक्रम वूटवर सुरु होणार आहे. या शोचा पहिला सीझन प्रचंड गाजला होता. या शोला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली होती. यावेळी या शोचा दुसरा धमाकेदार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, यावेळी करण जोहर (Karan Johar) सूत्रसंचालन करताना दिसणार नाहीये. मागच्या सीझनमध्ये त्याच्या सूत्रसंचालानावर अनेक टीका टिप्पण्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळेच यावेळी त्याला शोमधून डच्चू देण्यात आला असल्याचे कळते आहे. यावेळी निर्माते अशा चेहऱ्याच्या शोधात आहेत, जो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होईल आणि स्पर्धकांचे लक्ष आकर्षित करून घेईल.
अलीकडेच, अशी बातमी आली होती की, टीव्ही इंडस्ट्रीतील टॉप कपल अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा हा शो होस्ट करताना दिसणार आहेत. सूत्रसंचालकपदी या जोडीचे नाव अग्रक्रमी आहे. तर, दुसरीकडे या पदावर हिना खानची देखील वर्णी लागू शकते. आता हा शो नेमका कुणाच्या पदरात पडणार हे लवकरच जाहीर होणार आहे.
कोण मारणार बाजी?
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेत्री करण कुंद्रा ही छोट्या पडद्यावरची जोडी सध्या प्रचंड चर्चेत आहे. या जोडीला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळत आहे. तर, अभिनेत्री हिना खान देखील तिच्या कान्स डेब्यूमुळे चर्चेत आली आहे. ती तिच्या बेधडक शैलीसाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. बिग बॉससारख्या रिअॅलिटी शोसाठी हिना खान परफेक्ट सूत्रसंचालक सिद्ध होऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार, हिना खान सध्या निर्मात्यांशी याविषयी चर्चा करत आहे. नुकतीच हिना खान कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मधून परतली आहे. या मानाच्या पुरस्कार सोहळ्यात तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. हिना खान कान्समध्ये तिच्या हटके फॅशन सेन्स आणि स्टायलिंगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
हेही वाचा: