Rubina Dilaik : छोट्या पडद्यावरील खतरों के खिलाडी या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या 12 व्या (Khatron Ke Khiladi Season 12) सिझनला सुरुवात झाली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी हा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. खतरों के खिलाडीच्या 12 व्या सिझनमध्ये अभिनेत्री रूबीना दिलैक (Rubina Dilaik) ही सहभागी होणार आहे. नुकताच रुबीनानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये रुबीना ही रोहित शेट्टीला काही प्रश्न विचारताना दिसत आहे.
रुबिनानं रोहित शेट्टीला प्रश्न विचारला की, 'सर, या शोमध्ये असं काय आहे की, प्रत्येक सिझनचं सूत्रसंचालन तुम्ही करता?' या प्रश्नाला रोहितनं उत्तर दिलं, 'मला या कार्यक्रमाचा जॉनर आवडतो. हेच स्टंट माझ्या चित्रपटांमध्ये असतात. बाकी जॉनरवर माझी कमांड नाहीये. प्रेक्षक या कार्यक्रमाला पसंती देतात. त्यामुळे मला हा शो आवडतो.'
पुढे रुबिना प्रश्न विचारते, 'या कार्यक्रमाच्या सेटवरील अशा कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्यांची तुम्ही काळजी घेता' यावर रोहित शेट्टी म्हणतो, 'फिअर फंदा आणि स्पर्धकांना चुकूनही दुखापत होऊ नये.' तसेच रोहितनं सांगितलं की, कार्यक्रमाचे शूट करत असताना तो इंडियन फूड मिस करत आहे. तसेच रोहितनं त्याचं आवडतं लोकेशन केपटाउन आहे, असंही मुलाखतीमध्ये सांगितलं. रुबिनानं नंतर रोहितला त्याच्या आवडत्या स्पर्धकाचं नाव विचारलं तर रोहितनं या प्रश्नाचं उत्तर रूबिना असं दिलं.
खतरों के खिलाडी 12 चे शूटिंग साऊथ आफ्रिकेमधील जंगलामध्ये होत आहे. या सिझनमध्ये 15 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. रुबीना दिलैक, श्रीती झा, शिवांगी जोशी, कनिका मान, मोहित मलिक, निशांत भट्ट, राजीव अदातिया, तुषार कालिया, एरिका पॅकर्ड, चेतना पांडे, अनेरी वजानी या सेलिब्रिटींनी या शोमध्ये सहभाग घेतला आहे. तर सोशल मीडिया स्टार जन्नत जुबैर आणि मिस्टर फैजू हे देखील या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
हेही वाचा:
- Kanika Mann Injured : शरीरावर जखमा, चेहऱ्यावर हसू ; खतरों के खिलाडीमधील टास्क दरम्यान कनिकाला झाली दुखापत
- Khatron Ke Khiladi 12 : 'खतरों के खिलाडी'चे बारावे पर्व 2 जुलैपासून होणार सुरू; प्रोमो आऊट