Swayamvar Mika Di Vohti : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंह (Mika Singh) याचा स्वयंवर शो 'मिका दी वोटी'मध्ये (Swayamvar Mika Di Vohti ) अगदी पहिल्या दिवसापासूनच धमाल होताना दिसत आहे. या शोमध्ये एकूण 12 तरुणी सहभागी झाल्या होत्या. मात्र, दुसऱ्याच दिवशी 4 सुंदरींना थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता नव्या एपिसोडमध्ये मिका पुन्हा एकदा तीन तरुणींसोबत डेटवर गेला आहे, ज्यांचा प्रोमो व्हिडीओ चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आला आहे.


स्टार भारत वाहिनीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर 'स्वयंवर - मिका दी वोटी' चा नवा प्रोमो रिलीज केला आहे. या व्हिडीओमध्ये मिका सिंह आणि तीन तरुणी घोड्यावर बसून रपेट मारताना दिसत आहेत. मिका सोबतच या तीन स्पर्धक तरुणी देखील घोडेस्वारीचा आनंद घेत आहेत.


या व्हिडीओमध्ये मिका सिंह 'शोले' चित्रपटातील गब्बर सिंहप्रमाणे बोलताना दिसत आहे, 'सरकारने आमच्यावर किती बक्षीस ठेवले आहे?’, असे तो विचारतो. त्यावर मागून आवाज येतो, '50 हजार.' तरुणीचे हे उत्तर ऐकून मिका सिंह म्हणतो की, 'या आहेत माझ्या लाडक्या राजकन्या... यांनी मिका सिंहला पूर्ण वर बनवले आहे. त्याची शिक्षा यांना मिळणार.. लग्न कधी आहे... लग्न कधी आहे.'


पाहा व्हिडीओ :  



‘मिका दी वोटी’च्या आगामी एपिसोडचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच आगामी एपिसोड पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक झाले आहेत. मिकाच्या या शोमध्ये त्याची बहिण बनून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी देखील मुलींशी गप्पा मारणार आहे. त्यांना काही खास टिप्स देणार आहे. दिव्यांका स्पर्धेतील मुलींना 'स्पिड-डेटिंग' च्या टिप्स देताना दिसली. स्पिड डेटिंगबाबत ऐकताच स्वयंवरातील काही मुली या आश्चर्यचकित झाल्या, तर काही आनंदी झाल्या. स्पिड डेटिंग या टास्कमुळे आता मिकाच्या स्वयंवरात कोणता ट्वीस्ट येईल? हे लवकरच प्रेक्षकांना समजणार आहे. 


12 मुलींमधून मिका करणार एकीची निवड


‘स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात 12 मुली सहभागी होणार आहेत. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची जोडीदार म्हणून निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या होत्या. 12 मुलींमधून मिका जोडीदार म्हणून कोणाची निवड करणार हे पाहणं मनोरंजक असणार आहे.


संबंधित बातम्या


Swayamvar Mika Di Vohti : मिका सिंहचे जोधपूरमध्ये होणार स्वयंवर; 19 जूनपासून कार्यक्रमाला सुरुवात


Swayamvar Mika Di Vohti :  मिकाच्या स्वयंवरात पहिल्याचं दिवशी भांडण; बुशरा-नीतमध्ये बाचाबाची