Swayamvar Mika Di Vohti : बॉलिवूड गायक मिका सिंह (Mika Singh) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. स्टार भारतच्या 'स्वयंवर: मिका दी वोटी' या शोमधून मिका आपली आयुष्यभराची जोडीदार निवडणार आहे. ‘मिका दी वोटी’ (Swayamvar Mika Di Vohti) हा शो 19 जूनपासून रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे. या शोची घोषणा झाल्यापासून मिकाचे चाहते देखील उत्सुक झाले आहेत. मेकर्स देखील दररोज नवे प्रोमो रिलीज करून चाहत्यांची आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे.


लवकरच 'स्वयंवर : मिका दी वोटी' हा रिअॅलिटी शो टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या स्वयंवरात देशभरातील अनेक भागांतील मुली मिका सिंहची वधू बनण्यासाठी सहभागी झाल्या आहेत. नुकताच या शोचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी मिकाला चक्क कीस करताना दिसली आहे.


मिका म्हणतोय कंट्रोल!


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये मिका सिंहला या शोच्या स्टेजवर पाहून एक मुलगी इतकी आनंदी होते की, ती त्याला थेट किस करते. मिका मात्र यावेळी तिला स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास सांगतो. या व्हिडीओमध्ये दिसते की, एक मुलगी हातात एक ताट धरून मिकाकडे येते. त्यानंतर मुलगी मिकाला फ्लाइंग किस देते आणि मिका तिला स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास सांगतो. मात्र ती मुलगी पुढे येऊन थेट त्याच्या गालाचे चुंबन घेते आणि गुडघ्यावर बसून आपले प्रेम व्यक्त करते. नंतर म्हणते की, कंट्रोल करूच शकत नाही. सध्या हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे.


पाहा व्हिडीओ :



‘या’ दिवसापासून होणार सुरु शो!


'स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. अशातच या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाल्यामुळे प्रेक्षक आता या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा कार्यक्रम 19 जून 2022 पासून स्टार भारतवर रात्री आठ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लोकप्रिय गायक शान (Shaan) हा कार्यक्रम होस्ट करणार आहे.


किती मुली होणार सहभागी?


'स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात एकूण 12 मुली सहभागी होणार आहेत. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या आहेत. 12 मुलींमधून मिका जोडीदार म्हणून कोणाची निवड करणार, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. 


हेही वाचा :


Swayamvar Mika Di Vohti : मिका सिंह जोडीदार म्हणून कुणाची निवड करणार? लवकरच 'स्वयंवर मीका दी वोटी' कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला


Mika Singh Swayamvar : नॅशनल टीव्हीवर मिका सिंह रचणार स्वयंवर!


Happy Birthday Mika Singh : बॉलिवूडचा स्टार गायक, राखी सावंत चुंबन प्रकरणामुळे राहिला चर्चेत!