Mika Singh Birthday : बॉलिवूड प्रसिद्ध गायक मिका सिंह (Mika Singh) आज म्हणजेच 10 जून रोजी त्याचा 45वा वाढदिवस साजरा करत आहे. मिकाने बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत आणि त्याची सर्व गाणी खूप लोकप्रिय झाली आहेत. त्याने केवळ बॉलिवूडसाठीच नाही, तर प्रादेशिक चित्रपटांसाठीही गाणी गायली आहेत. मिका हा खूप चांगला भजन गायक देखील आहे. कामांमुळे चर्चेत असणारा असणार मिका त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र वादांनी घेरलेला होता.


10 जून 1977 रोजी दुर्गापूर, पश्चिम बंगालमध्ये जन्मलेला मिका सिंह 45 वर्षांचा झाला आहे. मिकाचे खरे नाव अमर सिंह आहे. पण, बॉलिवूडने त्याला ‘मिका’ या नावाने वेगळी ओळख दिली. मिका हा प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदीचा भाऊ आहे.


भावाप्रमाणेच बनला गायक


मोठा भाऊ दलेर मेहंदी प्रमाणेच मिकाने देखील गायन क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि पॉप संगीताच्या जगात नाव कमावले. एक काळ असा होता की, गाणे पाहताना लोकांना नेहमी हिरोच दिसायचा. पण, मिकाने हा ट्रेंड बदलला. मिकाने एखाद्या चित्रपटात एखादे गाणे गायले, तर तो त्याची आणखी एक आवृत्तीही तयार करतो, ज्यामध्ये तो स्वतः गाताना दिसतो.


बॉलिवूडमध्ये करावा लागला संघर्ष


मिका सिंगने त्याच्या भावाच्या बँडमध्ये गिटार वादक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्याने भाऊ दलेर मेहंदीसाठी 'डर दी रब रब कर दी' हे सुपरहिट गाणेही तयार केले. त्यानंतर त्याने हे गाणे स्वतः गाण्याचा विचार केला. जेव्हा तो गाण्यासाठी स्टुडिओत पोहोचला, तेव्हा दलेर मेंदीच्या नावामुळे दिग्दर्शकाने त्याचे गाणे ऐकण्यासही नाही म्हटले.


मिकाचा संघर्ष इथेच संपला नाही. मिकाने स्टुडिओमध्ये अनेक फेऱ्या मारल्या. यानंतर मिकाने स्वतःचा अल्बम लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आणि 'सावन में लग गई आग' या पहिल्या सुपरहिट गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. यानंतर, जणू मिकाचा आवाज हीच त्याची ओळख बनली. आजघडीला मिका बॉलिवूडचा स्टार गायक आहे


राखी सावंत चुंबन प्रकरणामुळे राहिला चर्चेत!


एकदा मिकाने स्वतःच्याच वाढदिवशी असे काहीतरी केले, ज्यामुळे तो बरीच वर्षे चर्चेत राहिला. मुलीही त्याच्यापासून दूर राहू लागल्या. ही घटना 14 वर्षांपूर्वी घडली होती, जेव्हा मिकाने राखी सावंतला वाढदिवसाच्या पार्टीत जबरदस्तीने किस केले होते. यावर स्पष्टीकरण देताना मिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी राखीला माझ्या वाढदिवसाच्या पार्टीला आमंत्रित केले नव्हते. या पार्टीत माझे काही जवळचे मित्र सामील होते. पण, ती तिथे संगीत दिग्दर्शक आशिष शेरवूडसोबत आली होती. मी काही बोललो नाही, सर्व काही ठीक चालले होते. पण, मग राखी पुन्हा पुन्हा माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागली. केक कापण्याआधीच मी सर्वांना सांगितले होते की, मला ऍलर्जी आहे म्हणून कोणीही केक तोंडाला लावणार नाही. केक भरवताना राखीने जबरदस्तीने माझ्या चेहऱ्यावर केक लावला. त्याचा मला खूप राग आला आणि मी राखीला धडा शिकवण्यासाठी जबरदस्ती किस केले. यानंतर बराच गदारोळ झाला.


हेही वाचा :


Sidhu Moosewala : 'स्वत:ला पंजाबी म्हणायची लाज वाटते'; सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर मिका सिंहकडून पोस्ट शेअर


Mika Singh : '... म्हणून मी 20 वर्षात लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या 150 मुलींना नकार दिला'; मिका सिंहनं सांगितलं कारण