Shivani Surve-Sameer Paranjpe : स्टार प्रवाह वाहिनीवर थोडं तुझं आणि थोडं माझं (Thoda Tuza Thoda Maza) या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) आणि अभिनेता समीर परांजपे (Sameer Paranjpe) ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. तसेच या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वे ही 9 वर्षांनी तर अभिनेता समीर परांजपे हा 8 वर्षांनी स्टार प्रवाहवर कमबॅक करतायत. त्यामुळे त्यांच्या या मालिकेची प्रेक्षकांना देखील बरीच उत्सुकता लागून राहिली आहे.
समीर या मालिकेत प्रभू कुटुंबातील एक सदस्य दाखवला आहे. तो तेजस प्रभू हे पात्र साकारणार आहे. तसेच 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत ती मानसी सणस ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. समीरचं पात्र हे अत्यंत बिनधास्त तर मानसीचं पात्र हे तिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक असं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे मानसी आणि तेजसच्या प्रेमाचा प्रवास देखील या मालिकेतून पाहता येणार आहे.
मालिका कधीपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
ही मालिका येत्या 17 जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान ही मालिका रात्री 9 वाजता प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे स्टार प्रवाहवरील कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी सुर्वे ही देखील मुख्य भूमिकेत आहे. 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत ती मानसी सणस ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. अतिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक असलेली मानसी आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. वडिलांनी खूप कष्ट करून त्यांचं साम्राज्य उभं केलं. आपल्या मुलीनेही खूप शिकून नाव कमवावं असं त्यांना वाटतं. वडिलांचं स्वप्न मानसीला पूर्ण करायचं आहे.