Majhi Tuzi Reshimgath : माझी तुझी रेशीमगाठ (Majhi Tuzi Reshimgath) या मालिकेतून श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) ही मित्रांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. तसेच ही मालिकाही प्रेक्षकांना फार आवडली होती. त्यानंतर अनेकदा या मालिकेचा दुसरा भाग कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्यातच नुकतच संकर्षणने केलेल्या एका पोस्टमुळे या मालिकेचा दुसरा भाग येणार का अशी उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलीये. 


संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याचा आणि श्रेयसचा एक फोटो शेअर केला आहे. यामुळे हे दोघे पुन्हा एकत्र दिसणार का याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पण याबाबत संकर्षण आणि श्रेयस लवकरच खुलासा करतील. पण त्याआधी या दोघांची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. अनेकांनी देखील संकर्षणच्या पोस्टवर कमेंट करत ही जोडी पुन्हा पाहायला मिळणार असल्याचा आनंद व्यक्त केला आहे.                                                 


संकर्षणची पोस्ट नेमकी काय?


संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केलीये. या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने म्हटलं की, श्रेयस संकर्षण = यश समीर ल खूप दिवसांनी भेटलो.. खूप गप्पा मारल्या .. खूप हसलो …. फार फार मज्जा आली.ह्या गप्पा तुम्हालाही पहायला ऐकायला आवडतील का ..? कुठे कसं ते श्रेयस तळपदे सांगतील.  






'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रार्थना बेहरे (Prarthana Behere), श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि मायरा वायकुळ (Mayra Vaikul) मुख्य भूमिकेत होते. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावरही अधिराज्य गाजवलं. पण सध्या संकर्षण आणि श्रेयस नवं प्रोजेक्ट घेऊन येणार की जुनी मालिकाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सध्या श्रेयसचे अनेक काही सिनेमे रिलीच्या प्रक्रियेत आहेत. तसेच संकर्षण हा निमय व अटी लागू या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 


ही बातमी वाचा : 


''पंतप्रधान ध्यान-साधनेला बसले अन् सूर्यदेवाला शांत केलं, आज वारं वाहतंय''; खासदार महोदयांचा गजब दावा