Premachi Goshta Serial Update :  'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेत सागर-मुक्ता यांच्यात प्रेमाचे बंध घट्ट होत आहेत. प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर दोघे संकटाला सामारे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मुक्ताविरोधात तक्रार करणारा सत्यम पाटील कोण आहे, हे सागरला समजणार का, सावनी-हर्षवर्धनला सागर प्रत्युत्तर देणार की त्याच्यावर हल्ला होणार, हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 


सागर-मुक्ता होणार रोमँटिक


बाथरुमचा दरवाजा उघडाच असतो. सागर तयार होऊन गेला असेल असे मुक्ताला वाटत असते. त्यामुळे मुक्ता बाथरुममध्ये जाते तेव्हा बाथटबमध्ये सागर असतो. एकमेकांना पाहून दोघांचा गोंधळ उडतो. बाथरुमचा लॉक बिघाडामुळे आतून बंद होतो.  दोघेही बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्या प्रयत्नात ते पाय घसरुन पडतात. त्यावेळी सागर मुक्ताला सावरण्याचा प्रयत्न करतो. या छोट्या वेळेत मुक्ता-सागर रोमँटिक होतात. 


कट यशस्वी झाल्याने सावनी आनंदात


इकडं आपला कट यशस्वी होतोय हे लक्षात येत असल्याने सावनी, हर्षवर्धन आणि कार्तिक आनंद व्यक्त करतात आणि पुढचा डाव आखतात. स्वाती कार्तिकला फोन करुन मुक्ताचा वैद्यकीय परवाना रद्द झाला असल्याची बातमी देते. त्या घरात काय घडतंय हे मला कळतं असे कार्तिक सांगतो. आता, त्या घराला आणखी एक धक्का बसणार असल्याचे कार्तिक स्वातीला सांगतो. तू मुक्तासोबत चांगलं वागण्याचे नाटक सुरूच ठेव असे कार्तिक सांगतो. मुक्तामुळे आपल्याला तुरुंगात जावे लागले, बायको आणि मुलीपासून दुरावलो आहोत. त्यामुळे याचा बदला घेणार असल्याचे कार्तिक सावनीला सांगतो.


मुक्ताविरोधातील तक्रारदाराची शोधाशोध


सागर मुक्तासह वकिलांची भेट घेतो. त्यावेळी वकील तक्रारदार सत्यम याचा कुठेच थांगपत्ता लागत नसल्याचे सांगतो. या तक्रारदाराला तातडीने शोधा असे सागर वकिलांना सांगतो. त्याने सागर कोळीच्या बायकोवर आरोप केले आहेत. आता कोर्टाच्या बाहेर किंवा कोर्टात त्याला भरपाई करावीच लागणार असे सागर त्वेषात म्हणतो. 


माधवीच्या मनात आली शंका...


गोखलेंच्या घरी मिहिका आणि मिहीर यांच्या लग्नाची तयारी सुरू असते. मिहीर माधवीला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करतो. माधवी मावशीने आता जास्त काम करू नये असे मिहिरला वाटते. लग्न घर असूनही मुक्ता-सागर मदतीला फार येत नसल्याने दोघे कोणत्या कामात आहेत का, असा प्रश्न माधवीला पडतो.


सत्यम पाटीलचे सत्य सागरला समजणार... 


काही वेळेतच सागरच्या वकिलांना सत्यम पाटील याचा पत्ता लागतो. सत्यम पाटीलचा पत्ता हा सावनीचा पत्ता असल्याचे वकील सांगतो. आता आपण या दोघांना धडा शिकवणार असल्याचे सांगतो. रागाने लालबुंद झालेला सागर मिहिरसह हर्षवर्धनच्या घरी जातो. त्यावेळी सावनी, हर्षवर्धन आणि सत्यम पाटील हे सेलिब्रेशन करत असतात. सागर हर्षवर्धनला धक्काबुक्की करतो. त्यावेळी सागर हा सत्यमला धमकावत मुक्ताविरोधातील खोटी तक्रार मागे घेण्यास सांगतो. मिहिरदेखील सावनीने मुक्ताविरोधात केलेल्या कटावर नाराज होतो आणि सावनीला दोन शब्द सुनावतो. सागरने घरात येऊन अपमान केला, याचा बदला घेऊन सागरची लायकी त्याला दाखवून द्यायची आहे असे म्हणत सावनीने आपला पुढील स्पष्ट केला.