Shraddha Arya Bikini Look : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्रद्धा आर्या (Shraddha Arya) सध्या मालदीवमध्ये पती राहुल नागलसोबत हनीमून एन्जॉय करत आहे. श्रद्धा आर्या (Shraddha Arya Husband Rahul Nagal) हिने 16 नोव्हेंबरला राहुल नागलसोबत लग्नगाठ बांधली. श्रद्धाच्या पतीचा मनोरंजन उद्योगाशी काहीही संबंध नाही, ते नौदल अधिकारी आहेत. लग्नानंतर लगेचच श्रद्धा तिच्या 'कुंडली भाग्य' या शोच्या शूटिंगसाठी दिल्लीहून मुंबईला परतली होती. नुकतेच हे कपल हनीमूनसाठी मालदिवला रवाना झाले आहे. आता श्रद्धाचा तिच्या हनीमून व्हेकेशनमधील सिझलिंग बिकिनी अवतार समोर आला आहे. वास्तविक श्रद्धा आर्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती फोटो किंवा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्याची एकही संधी सोडत नाही.

Continues below advertisement

आता श्रद्धाने मालदिव (Maldives) मधील एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये श्रद्धाने पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. इतकंच नाही तर श्रद्धा पूलच्या बाजूला गाण्यावर थिरकताना दिसत आहे. श्रद्धाने काही तासांपूर्वी तिचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओ इतक्या कमी वेळात तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की चाहते तिचा व्हिडिओला किती लाईक करत आहेत. श्रद्धा आर्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Continues below advertisement

श्रद्धाने तिचा कोणताही फोटो आणि व्हिडिओ शेअर केला तर तो काही सेकंदात व्हायरल होतो. श्रद्धा आर्यने अनेक शोमध्ये काम केले असले तरी 'कुंडली भाग्य' (Kundali Bhagya) मध्ये प्रीताची भूमिकेमुळे तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha