Krushna Abhishek Teases Alia Bhatt on Ranbir Kapoor : सध्या सोशल मीडियावर अभिनेता रणबीर कपूर  (Ranbir Kapoor)आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) या जोडीबद्दल चर्चा सुरू आहे. या दोघांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. रणबीर आणि आलिया एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा आहे. पण याबाबत आलिया आणि रणबीरने कोणतीही माहिती अजून चाहत्यांना सांगितली नाही.  'द कपिल शर्मा शो'  (The Kapil Sharma Show) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शोमध्ये आलियाने हजेरी लावली. यावेळी कृष्णा अभिषेकने (Krushna Abhishek) आलियाला एक प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच आलियाला लाजली. 


द कपिल शर्मा शोमध्ये कृष्णा अभिषेक म्हणाला की, 'मला 'कपूर अँड सन्स' हा चित्रपट खूप आवडतो.' त्यानंतर तो म्हणला, ' 'कपूर अँड बहू' हा चित्रपट कधी येणार आहे?' असा प्रश्न कृष्णाने विचारताच आलिया लाजली. शोमधील उपस्थित असलेल्यांना कृष्णाचा हा प्रश्न ऐकून हस अनावर झाले.






आरआरआर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'द कपिल शर्मा शो' मध्ये आलियाने  हजेरी लावली होती.  लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  रिपोर्टनुसार,  डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 या दरम्यान रणबीर आणि आलियाचा लग्न सोहळा पार पडणार आहे, अशी चर्चा आहे.


संबंधित बातम्या


Alia Bhatt Ranbir Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नाची तारीख ठरली? 'या' ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा?


Bollywood Weddings In 2022 : मलायका- अर्जून ते आलिया-रणबीर; हे सेलिब्रिटी 2022 मध्ये अडकणार लग्नबंधनात?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha