Bigg Boss Marathi 3 :  विशाल निकम 'बिग बॉस मराठी सिझन 3'चा (Bigg Boss Marathi 3) महाविजेता ठरला आहे. विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शहा या पाच स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली होती. विशाल सांगली जिल्ह्यातील देविखिंडी गावचा आहे. विशाल 'बिग बॉस मराठी सिझन 3'चा महाविजेता झाल्याने विशालच्या गावी जल्लोष केला जात आहे. 


रविवारी बिग बॉस मराठीचा ग्रॅंड फिनाले दिमाखात पार पडला. विशाल निकमला 20 लाख धनराशी आणि ट्रॉफी मिळाली आहे. खेळाडूवृत्ती, टास्क जिंकण्याची जिद्द, घरातील वावर, स्पष्टवक्तेपणा यामुळे विशाल नेहमीच चर्चेत राहिला आहे. विशाल महाविजेता झाल्याने विशालच्या घराबाहेर चाहत्यांचा जल्लोष आणि फटाक्यांची आतषबाजी होत आहे. विशालवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. 


जय दुधाने आणि विशाल निकम हे 'बिग बॉस मराठी सिझन 3' चे टॉप 2 सदस्य होते. त्यातून विशाल निकम या पर्वाचा महाविजेता झाला आहे. बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वातील प्रत्येक भागामध्ये झालेल्या टास्कने, वादाने, प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.





कोण आहे विशाल निकम?
विशालचा जन्म 10 फेब्रुवारी 1994 रोजी सांगली जिल्ह्यातील देविखिंडी येथे झाला. विशालला अभिनयासोबतच फिटनेसचीदेखील आवड आहे. विशालने त्याच्या करिअरची सुरुवात मिथुन या सिनेमाद्वारे केली. हा सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. 'साता जल्माच्या गाठी' या मालिकेतील विशालच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेमुळे विशालला लोकप्रियता मिळाली. तसेच 'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेमध्ये देखील विशालने महत्त्वाची भूमिका साकारली. 


संबंधित बातम्या


Monitor Harshad Naybal : नव्या वर्षात 'सूर नवा ध्यास नवा'च्या मॉनिटरची होणार 'पिंकीचा विजय असो' मालिकेत एन्ट्री


Year Ender 2021 : आर्यन खान, राज कुंद्राची अटक ते कंगना रनौतच्या ट्विटरवर बंदी... जाणून घ्या बॉलिवूडमध्ये काय घडलं या वर्षभरात


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha