Shark Tank India Season 2: 'ये दोगलापन है'; शार्क टँक इंडिया 2 च्या प्रोमोमध्ये अश्नीर ग्रोव्हर नसल्यानं नेटकऱ्यांचा संताप
‘शार्क टँक इंडिया 2’(Shark Tank India Season 2) चा प्रोमो काल (2 नोव्हेंबर) रिलीज झाला. या प्रोमोमध्ये अश्नीर ग्रोवर हे नसल्यानं आता नेटकरी भडकले आहेत.
Shark Tank India Season 2: शार्क टँक इंडिया (Shark Tank India) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. स्वत:चा व्यवसाय सुरू करणारे लोक त्यांच्या वेगवेगळ्या कल्पना घेऊन या शोमध्ये लोक येतात. त्यामधील काही कल्पना या अतरंगी देखील असतात. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘शार्क टँक इंडिया 2’(Shark Tank India Season 2) चा प्रोमो काल (2 नोव्हेंबर) रिलीज झाला. या प्रोमोमध्ये अश्नीर ग्रोव्हर हे नसल्यानं आता नेटकरी भडकले आहेत.
सोनी टीव्हीनं सोशल मीडियावर शार्क टँक इंडिया सीझन 2 चा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये एका महिला भाजी घेताना दिसत आहे. यावेळे तो भाजीवाला शार्क टँक ज्या स्टाईलनं भाजी विकताना दिसत आहे. या प्रोमोच्या शेवटी नव्या सिझनचे काही परीक्षक दिसतात. यामध्ये शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सिझनचे परीक्षक असलेले अश्नीर ग्रोव्हर दिसत नाहीत. त्यामुळे आता नेटकरी भडकले आहेत.
एका नेटकऱ्यानं ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोला कमेंट केली, 'या शोमध्ये अश्नीर ग्रोव्हर असायला पाहिजेत. त्यांच्याशिवाय शो कंटाळवाणा होईल.'
Ab pura India business ki sahi value samjhega! 💸#SharkTankIndiaSeason2 coming soon, on Sony Entertainment Television#SharkTankIndiaSeason2onSony pic.twitter.com/Pw7XDLiLee
— sonytv (@SonyTV) November 1, 2022
तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'शार्क टँक 2 चा प्रोमो रिलीज झाला आहे. लोक त्यांच्या दिवाळीच्या सुट्टीपेक्षा जास्त सध्या अश्नीर ग्रोव्हरला मिस करत आहेत. '
Guys shark tank season 2 ka promo aa gaya hai,
— krutarth thacker (@kru_tarth) November 1, 2022
Aur log apne diwali vacation ke maze se zyada aaj ashneer grover ko miss kar rahe.
The doglapan will be missed by everyone ❤️
Just saw #SharkTank season 2 trailer....but without @Ashneer_Grover spark is clearly missing pic.twitter.com/lril4m6WkZ
— New Variant (@loki_ka_halwa) November 1, 2022
अश्नीर हे त्यांच्या लग्झरी लाईफास्टाईलमुळे चर्चेत असतात. त्यांच्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. अश्नीर ग्रोव्हर यांनी IIT दिल्लीमधून सिविल इंजिनियरिंगमध्ये B-Tech ही डिग्री मिळवली आहे. तसेच त्यांने IIM अहमदाबाद मधून MBA केले आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या सीझन प्रमाणेच दुसऱ्या सीझनमध्ये देखील ‘शादी डॉट कॉम’ची सह-संस्थापक अनुपम मित्तल, ‘बोट’ कंपनीचे को सह-संस्थापक अमन गुप्ता, ‘लेंस्कार्ट’ कंपनीचे संस्थापक पीयुष बंसल, 'शुगर कॉस्मेटिक्स' कंपनीच्या सह-संस्थापक विनीता सिंह आणि 'एमक्योर फार्मास्युटिकल्स'च्या कार्यकारी संचालक नमिता थापरही दुसऱ्या सीझनमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडतील. कार देखो ग्रुपचे सह-संस्थापक आणि सीईओ अमित जैन यांची दुसऱ्या सीझनमध्ये एन्ट्री होणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: