Shark Tank India-2: छोट्या पडद्यावरील 'शार्क टँक इंडिया-2' (Shark Tank India-2) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनप्रमाणेच दुसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. 'शार्क टँक इंडिया' या शोमध्ये स्वत:चा व्यवसाय असणारे लोक येतात. हे लोक शोमधील परीक्षकांना त्यांची बिझनेस आयडिया सांगतात. शार्क टँक इंडियाच्या नुकत्याच एका एपिसोडमध्ये एका 85 वर्षांच्या आजोबांनी हजेरी लावली. या शोमध्ये या आजोबांनी त्यांच्या आयुर्वेदिक तेलाच्या व्यवसायाची माहिती शार्क्सना दिली.
85 वर्षाच्या आर. के. चौधरी यांनी शार्क टँकमध्ये हजेरी लावली. आर. के. चौधरी हे त्यांच्या कुटुंबासोबत आयुर्वेदिक तेलाचा व्यवसाय करतात. त्यांनी शार्क टँक इंडियामध्ये त्यांच्या Avimee Herbal या हेअरकेअर आणि स्किनकेअर कंपनीची माहिती दिली.
आर. के. चौधरी यांनी शोमधील शार्क्सना सांगितले, 'कोविडनंतर घरातील प्रत्येकाला केस गळण्याची समस्या जाणवत होती, त्यानंतर मी ही कंपनी सुरू केली. कोविडनंतर जेव्हा मुलांचे केस गळण्याची समस्या समोर येऊ लागली. तेव्हा त्यांनी एक तेल बनवले. मी माझ्या मुलीला सांगितले की, हे तेल लावून बघ, तुझे केस गळायचे थांबतील. त्यानंतर माझ्या मुलीने मला स्पष्ट उत्तर दिले, आधी तुम्ही हे तेल लावा. मगच मी तेल लावेल. त्यानंतर मी तेल लावल्यानंतर माझ्या डोक्यावर केस येऊ लागले. मी तयार केलेलं तेल केस गळतीवर फायदेशीर ठरलं.'
शार्क्सना दिली तगडी ऑफर
आर. के. चौधरी यांच्या स्टोरीनं शार्क प्रेरित झाले. आर. के. चौधरी यांनी परीक्षकांना 2.8 कोटी आणि 0.5 टक्के इक्विटी अशी ऑफर दिली. शोमधील परीक्षकांना त्यांच्या ऑफरची अमाऊंट खूप मोठी वाटली. अमन गुप्ता, नमिता थापर आणि पियूष बंसल यांनी आर. के. चौधरी यांची ऑफर स्विकारण्यास नकार दिला. अमित जैन यांनी 1 कोटीवर 2.5 टक्के इक्विटीची ऑफर दिली. तर, अनुपम मित्तल यांनी 70 लाखांवर 2 टक्के इक्विटीची ऑफर दिली. पण त्यानंतर आर. के. चौधरी यांच्या कुटुंबानं शार्क्सनाच काउंटर ऑफर देत 2.8 कोटींवर 1.5 टक्के इक्विटीची ऑफर दिली. पण परीक्षकांमध्ये आणि आर. के. चौधरी यांच्यामध्ये डिल होऊ शकली नाही.
'शार्क टँक इंडिया' या शोमध्ये स्वत:चा व्यवसाय असणारे लोक त्यांच्या वेगवेगळ्या बिझनेस आयडिया घेऊन येतात. त्यामधील काही कल्पना या अतरंगी देखील असतात. या शोमधील परीक्षक हे शोमध्ये येणाऱ्या व्यक्तींसोबत संवाद साधून त्यांच्या आयडिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. जर त्या व्यक्तीची कल्पना परीक्षकांना आवडली तर ते त्या व्यक्तीच्या व्यावसायासाठी मदत करतात, असा हा कार्यक्रम आहे.
महत्वाच्या इतर बातम्या: