Aboli Mrathi Serial : आज संपूर्ण भारतात 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023) साजरा केला जातोय. अनेक ठिकाणी परेड, रॅलीचं आयोजन केलं जातंय. झेंडावंदन करून देशाप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलं जातंय.अशातच छोट्या पडद्यावरील मालिकाही उत्सवाची कुठे कमी भासू देत नाही. प्रजासत्ताक दिनाचा असाच उत्साह स्टार प्रवाहच्या 'अबोली' (Aboli) मालिकेत 28 जानेवारी रोजी पाहायला मिळणार आहे.
मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी अबोली आणि अंकुशबरोबर चाळीतील सर्वांनीच पुढाकार घेऊन प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्याचं ठरवलं आहे. विशेष म्हणजे या खास दिवशी अबोलीने वकील व्हावं ही इच्छा अंकुश बोलून दाखवणार आहे. इतकंच नाही तर त्याने अबोलीला स्वतःबरोबर ध्वजारोहणाचा मानही दिला आहे.
महिलांचा सन्मान आणि त्यांच्या पंखांना नवं बळ देण्याचा विचार स्टार प्रवाहच्या प्रत्येक मालिकांमधून मांडला जातो. अबोली मालिकेतील हा प्रसंग तमाम महिला वर्गासाठी नक्कीच प्रेरणादायी असेल. एकीकडे नीताने न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलं असताना तिच न्यायव्यवस्था कशी न्याय मिळवून देते, आणि न्यायव्यवस्था बळकट करण्यासाठी अबोली सारख्या वकीलांची समाजाला गरज असल्याचं महत्त्व अंकुश पटवून देणार आहे.
अबोली मालिकेतील हा खास प्रसंग खरोखरच कौतुकास्पद आहे. अंकुशचं हे स्वप्न अबोली पूर्ण करणार का? हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. मात्र, आज या मालिकेत प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष साजरा करताना सगळे कलाकार दिसणार आहेत.
'अबोली' या मालिकेत गेल्या काही दिवसांत अनेक ट्विस्ट अॅन्ड टन्स पाहायला मिळाले. ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. विशेषत: कोर्टात अबोलीने अंकुशची बाजू घेतल्यानंतर ही मालिका प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत आहे. अबोली मालिकेचा प्रजासत्ताक दिन विशेष भाग पाहायला विसरु नका अबोली 28 जानेवारी रोजी रात्री 10.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
महत्त्वाच्या बातम्या :