Shark Tank India 2: 'शार्क टँक इंडिया'चा दुसरा सीझन (Shark Tank India 2) प्रेक्षकांची मनं जिंकतोय. बिझनेस बेस्ड रिअॅलिटी शोमध्ये अनेक नवखे उद्योजक आपलं नशीब आजमावण्यासाठी आणि आपल्या उद्योगासाठी गुंतवणूकदार (Investors) मिळवण्यासाठी येत असतात. सध्या शार्क टँकमध्ये (Shark Tank) आलेल्या एका उद्योजकाची सोशल मीडियावर चर्चा सुरूये.
'शार्क टँक इंडिया'च्या दुसऱ्या सीझनमध्ये आलेले उद्योजक गणेश बालकृष्णन (Ganesh Balakrishnan) यांची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. गणेश बालकृष्णन यांनी त्यांच्या खडतर प्रवासाची कहाणी सांगितली आणि केवळ शार्कचं नाही तर प्रेक्षकांनाही भावूक केलं आहे. जजेसह अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू तराळले. पण खरं आश्चर्य म्हणजे, 'शार्क टँक इंडिया'मध्ये दिसल्यानंतर बालकृष्णन यांचं नशीब उजळलं. केवळ 48 तासांतच जे घडलं, ज्याची बालकृष्णन यांनी कल्पनाही केली नव्हती.
बालकृष्णन यांचं नशीब उजळलं
गणेश बालकृष्णन यांच्या कहाणीनं शार्क्सना भावूक केलं, पण कोणत्याही शार्कनं त्यांची ऑफर स्विकारली नाही. मोठ्या अपेक्षांनी 'शार्क टँक इंडिया'मध्ये आलेल्या गणेश बालकृष्णन यांना शोमधून रिकाम्या हातानं परतावं लागलं. पण, सोशलल मीडियावर शार्क टँकमधील त्यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. आयआयटी आणि आयआयएमचे विद्यार्थी असलेल्या बालकृष्णन यांनी 'शार्क टँक इंडिया'मधील आपल्या कथेनं सर्वांना भावूक केलं. बालकृष्णन यांनी शार्क्सना सांगितलं की, त्यांचा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे.
'शार्क टँक इंडिया'मधील त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलताना बालकृष्णन यांनी सांगितलं की, त्यांनी 2019 मध्ये Flatheads Shoes नावाची कंपनी उघडली होती. त्याचं काम चांगलं होऊ शकलं असतं, पण कोरोनामुळे त्यांचा उद्योग डबघाईला आला. बालकृष्णन यांनीही सांगितलं की, व्यवसाय वाचवण्यासाठी त्यांनी दोन महिन्यांत 35 लाख रुपये गुंतवले आहे. 'शार्क टँक इंडिया'मध्ये ते त्यांच्या व्यवसायासाठी गुंतवणूक मिळवण्यासाठी आले होते. त्यांच्या स्ट्रगल स्टोरीनं सर्वांनाच भावूक केलं. पण त्यांना गुंतवणूक मात्र मिळू शकली नाही.
भावूक झाले प्रेक्षक
बालकृष्णन यांच्या कथेनं केवळ शार्कच नाही, तर सर्वसामान्यांनाही भावूक केलं. सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झाला आणि पाहता पाहता केवळ 48 तासांतच बालकृष्णन यांना इतक्या ऑर्डर मिळाल्या की, त्यांची सगळी इन्वेंट्री विकली गेली. बालकृष्णन यांनी ही आनंदाची बातमी लिंक्डइनवरुन (linkedin) शेअर केली. बालकृष्णन यांनी सांगितलं की, त्यांची सर्व इन्वेंट्री विकली गेली आहे. त्यामुळे नव्यानं ऑर्डर प्लेस करणाऱ्या लोकांना त्यांच्या साईटवर योग्य साईजमध्ये शूज मिळत नाहीत.
शार्क टँक इंडियामधील शार्क अनुपम मित्तल यांनी शार्क टँक इंडियामध्ये गणेश बालकृष्णन यांना नोकरीची ऑफर दिली होती. पण, बालकृष्णन यांनी ती ऑफर थेट नाकारली. त्यांना पीयूष बन्सल आणि विनिता सिंह यांच्याकडून 33.3% इक्विटीसाठी 75 लाख रुपयांच्या निधीची ऑफर देखील दिली होती, पण ही ऑफरही बालकृष्णन यांनी नाकारली. दोन्ही ऑफर नाकारुन ते शोमधून रिकाम्या हातानी परतले खरे, मात्र त्याचवेळी त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. मग चाहत्यांनी त्यांच्यासाठी जे केलं ते आपण पाहिलंच.
महत्त्वाच्या इतर बातम्या :