Sayantani Ghosh : टीव्ही अभिनेत्री सायंतानी घोष ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सायंतानीने एकता कपूरच्या 'नागिन'पासून 'संतोषी मां'पर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. इतर अभिनेत्रींप्रमाणे सायंतानीचा प्रवासही चढ-उतारांचाच आहे. सायंतानीलाही एका वेळी बॉडी-शेमिंग आणि कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले होते. अलीकडेच बॉलिवूड बबलसोबत झालेल्या संभाषणात सायंतानीने याबाबत माहिती दिली आहे.
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सायंतानीने कास्टिंग काउचबद्दल सांगितले आहे. "तारूण्यात मला अनेक कमेंट्सचा सामना करावा लागला आहे. एका महिलेने माझ्याबद्दल केलेल्या कमेंट्सचा अर्थ देखील त्यावेळी मला समजला नव्हता. त्यावेळी मी कुमारी होते. मी विचार करत होते की, हे सर्व काय होत आहे? परंतु, अशा गोष्टींमुळे नकळत भीती वाटते, असे सायंतानीने सांगितले आहे.
"एका चित्रपट निर्मात्याने तिला काही वेळ एकत्र घालवण्यास सांगितले होते. त्यामुळे तो या भूमिकेसाठी तिला प्रशिक्षण देऊ शकेल. त्या निर्मात्याला माझी ताकद आणि कमकुवतपणा माहित होता. त्याने मला सांगितले की, मी ही भूमिका साकारू शकणार नाही हे त्याला माहीत आहे. त्यामुळे त्याने माझ्यासोबत थोडा वेळ घालवला आणि भूमिका चांगल्या प्रकारे समजावून सांगितली. त्यानंतर त्याने सांगितले की, आपल्याला एकमेकांना अधिक समजून घेण्यासाठी अजून एकत्र वेळ घालवला पाहिजे, असा खुलासा सायंतानीने केला आहे.
सायंतानी म्हणाली, 'मी या सर्व गोष्टींचा सामना केला आहे. परंतु, कधी कधी या गोष्टी आपल्याला उदास करतात. अशा गोष्टींवरून आपणच आपल्याला प्रश्न विचारू लागतो की, 'माझ्यामध्ये काही चूक आहे का? आपली कोणती चूक नसली तरी आपण आपल्या स्वाभिमानावर प्रश्नचिन्ह निर्माण करू लागतो."
महत्वाच्या बातम्या
- Majha Katta : 'मी जात मानत नाही', सोशल मीडियावरच्या टीकेला नागराजचं उत्तर
- Majha Katta : युद्धाचे परिणाम भारतावर होणार का?, युक्रेन-रशिया युद्धाचे सखोल विश्लेषण, पाहा काय म्हणतात गिरीश कुबेर
- Majha Katta: मराठीवर प्रेम करायला शिकलो, गिरणगावातील वातावरणाचा संगीतावर प्रभाव; संगीतकार आनंदजी यांनी जागवल्या आठवणी
- Majha Katta : शास्त्रीय संगीत शालेय अभ्यासक्रमामध्ये ठेवावा, तंतुवाद्य निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या कुंटुंबांची मागणी