Marathi Serial : सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी देणारी ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ (Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hava) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेतील एकत्र कुटुंब पद्धती आणि एकंदरतीच देशमुख कुटुंबातील सदस्यांची एकमेकांबद्दलच नाही तर त्यांच्याकडील पशु-पक्षांबद्दल देखील असलेली आत्मीयता प्रेक्षकांना भावली आहे. मात्र, मालिकेत आता एक मोठं वळण आलं आहे.


देशमुख कुटुंबाचा लाडका लेक सिद्धार्थ याला अमेरिकाला जाऊन सेटल व्हायचं आहे. यामुळे तो वाटेल ते करण्यास तयार झाला आहे. आदितीला फसवून अमेरिकेला नेण्याचा त्याचा प्लॅन उघडकीस आल्यावर देशमुख कुटुंबाने सिद्धार्थला खरी-खोटी सुनवत घराबाहेर काढले होते. मात्र, नंतर घरातल्यांनी परवानगी दिली.


सिद्धार्थची चोरी फसली!


अमेरिकेला जाण्याची परवानगी तर मिळाली, मात्र यासाठी कुटुंबाकडून आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने सिद्धार्थने घरात चोरी करण्याची योजना आखली होती. मात्र, आदितीच्या आणि काकाच्या सावधानीमुळे ही चोरी देखील फसली. आता मनासारख्या गोष्टी न घडल्यामुळे सिद्धार्थने पुन्हा एकदा बंड पुकारला आहे.   


मिलिंद सिद्धार्थला पुन्हा भडकवणार!


सिद्धार्थच्या वागण्यामुळे आता आदितीचे बाबा अर्थात मिलिंद देखील संतापले आहे. आपल्या मुलीचं भविष्य अमेरिकेतच आहे, असे त्यांना सतत वाटते. यामुळे ते पुन्हा एकदा सिद्धार्थला बोल लगावणार आहेत. ‘तुझ्यासारख्या मुलाशी माझ्या मुलीने लग्न केलं याची मला शरम वाटते. तिने मोठी चूक केलीये’, असे ते सिद्धार्थला म्हणतात. मात्र, यावर दुःखी न होता सिद्धार्थ हसू लागतो. त्याला हसताना पाहून मिलिंदचा पार आणखी चढतो. यावर सिद्धार्थ म्हणतो की, हेच सगळं तुम्ही आता घरच्यांसमोर बोला. अर्थात पुन्हा एकदा सिद्धार्थच्या डोक्यात काही तरी नवा प्लॅन बनला आहे, ज्यात तो मिलिंदला देखील सामील करून घेणार आहे.



हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha