Nagraj Manjule : मी कोणत्याही जातीला मानत नाही, त्यामुळे तुम्हीही मला कोणत्या जातीच्या बेडीत अडकवू नका असं आवाहन 'झुंड'चे  (Jhund) दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या यशानंतर 'झुंड'च्या टीमने एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते. 


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेला 'झुंड'  सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. एकीकडे या सिनेमाचे सिनेसृष्टीतील दिग्गजांसह प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. तर दुसरीकडे या सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. दरम्यान 'मी जात मानत नाही', असे नागराज मंजुळे एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या विशेष कार्यक्रमात म्हणाले. 


नागराज मंजुळे म्हणाले, "माझ्या जवळ सगळ्या जातींची माणसं आहेत. मी स्वत:ला कोणत्याच जातीचा मानत नाही. त्यामुळे मला कोणी कोणत्या जातीचा मानू नये. सोशल मीडियावरच्या कमेंट्स मी वाचत नाही. माझ्या घरात सगळ्या जातीचे लोक राहतात. मी जातीयवादी आहे, असं मला कोणी म्हटलं तरी मी ते गांभीर्याने घेणार नाही". 


नागराज मंजुळेंना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना नागराज मंजुळे म्हणाले, "मी कुठे चुकतोय हे मला समोर येऊन सांगा. फेसबुकवर नको. फेसबुक हे गंभीर माध्यम नाही. लोक घरी बसल्या काहीही लिहितात. माझ्यात विकार नाहीत, मी कोणाच्या विरोधात नाही. मी जातीच्या विरोधात आहे. मी माझ्यादेखील जातीच्या विरोधात आहे. जो जात-धर्म पाळतो त्या व्यक्तीच्या मी विरोधात आहे. जगातल्या उन्नत विचारसरणीच्या विरोधात आपण जे वागतो ते चुकीचे आहे".


संबंधित बातम्या


Majha Katta : युद्धाचे परिणाम भारतावर होणार का?, युक्रेन-रशिया युद्धाचे सखोल विश्लेषण, पाहा काय म्हणतात गिरीश कुबेर


Majha Katta: मराठीवर प्रेम करायला शिकलो, गिरणगावातील वातावरणाचा संगीतावर प्रभाव; संगीतकार आनंदजी यांनी जागवल्या आठवणी


Majha Katta : शास्त्रीय संगीत शालेय अभ्यासक्रमामध्ये ठेवावा, तंतुवाद्य निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या कुंटुंबांची मागणी


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha