मुंबई : जगभरातील प्रत्येक कलाकारांच्या हातामध्ये मिरजेमधीलच तंतुवाद्य आहे. मात्र काळानुसार ही कला मागे पडत असून ही कला जीवंत ठेवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी तंतुवाद्य निर्मिती क्षेत्रात गेली चार पिढ्या काम करणारे मुल्ला कुटुंबियांनी आज माझा कट्टयावर केली. सरकारने मुलांमध्ये संगीताची ऋची वाढवण्यासाठी शास्त्रीय संगीत हा विषय अभ्यासामध्ये ठेवला पाहिजे ज्यामुळे ही कला जीवंत राहिल असे देखील ते यावेळी म्हणाले. 


महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील मिरज शहर हे शास्त्रीय संगीताचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीय संगीतात तंतुवाद्यांचे एक वेगळे स्थान आहे. मिरज शहराची खास ओळख म्हणजे तंतुवाद्यांची निर्मिती करणे होय. तंतुवाद्य निर्मिती क्षेत्रात गेली चार पिढ्या काम करणारे मुल्ला कुटुंब आज माझा कट्टयावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मिरजेत वाद्याचे  संग्रहालय बनावे अशी इच्छा देखील  मुल्ला परिवराने यावेळी  व्यक्त केली आहे. 


कमीतकमी एक वाद्य तयार करायला एक ते दीड महिना लागतो. वाद्याचं नक्षीकाम, उंची आणि रुंदीनुसार त्याचा आकार तयार करणे, पॉलिश आणि त्यावर रंगकाम करणे, शेवटी त्यातून सूर काढणे, असे प्रत्येक काम वेगवेगळे व्यक्ति करतात. यामुळे कमी वेळात एखादं वाद्य लवकर तयार होतं. कलाकाराच्या मागणीनुसार प्रत्येक वाद्य तयार केलं जातं. कोणतंही वाद्य आधीच तयार करून ठेवलेलं नसतं.  कलाकारांच्या  मार्गदर्शनानुसार तानपुरा बनवला जातो, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. 


जगभरातील प्रत्येक कलाकारांच्या हातामध्ये मिरजेमधीलच तंतुवाद्य आहे. इतिहासात पहिल्यांदा कोरोनामुळे तंतुवाद्य निर्मितीची शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या गावात थोडासा फटका बसलेला आहे. महाराष्ट्रातील छोटेसे मिरज शहर येथे तयार झालेली वाद्ये भारतासह जगभर पाठवली जाते.


संबंधित बातम्या :



Majha Katta : माझा कट्ट्यावर रंगली परिचित-अपरिचित कवितांची मैफल, विसुभाऊ बापटांची माझा कट्ट्यावर हजेरी


Majha Katta : मराठी साहित्यामध्ये टोळी युद्धासारखा प्रकार, समीक्षकांमुळे साहित्याचं नुकसान; 'पानिपत'कार विश्वास पाटील यांची खंत