एक्स्प्लोर

मुंबई अँथम व्हिडिओमुळे ट्रोल, सचिन पिळगावकर म्हणतात...

'आमची मुंबई - द मुंबई अँथम' या व्हिडिओमुळे महागुरु सचिन पिळगावकर यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात होती.

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी सोशल मीडियावरील ट्रोलना उत्तर दिलं आहे. हा व्हिडिओ आपण पैशांच्या लालसेने किंवा कुठल्याही प्रलोभनामुळे केला नसल्याचं सचिन यांनी सांगितलं. 'आमची मुंबई - द मुंबई अँथम' या व्हिडिओमुळे महागुरुंची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात होती. मात्र हा व्हिडिओ आता डिलीट करण्यात आला आहे. 'शेमारु बॉलिगोली' या अकाऊंटवरुन 16 ऑगस्टला 'आमची मुंबई - द मुंबई अँथम' नावाचा पाच मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. सचिन पिळगावकरांनी हे गाणं गायलं असून त्यात ते नृत्य करताना दिसत आहेत. सचिन पिळगावकर यांनी या व्हिडीओमध्ये काम केल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, तर कोणी थेट्र ट्रोल केलं. 'आमची मुंबई' अल्बममधील हे गाणं मोहम्मद अकील अन्सारी यांनी लिहिलं असून व्हिडीओचं दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन डीसी द्रविड यांनी केलं आहे. 'मुंबई शहरात अनेक प्रकारचे लोक राहतात. हे शहर अफलातून आणि भन्नाट आहे. मुंबई शहराची हीचं वैशिष्ट्यं या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे' असं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं होतं. काही वर्षांपूर्वी एका कॉश्चुम डिझायनर मित्राला मदत करण्याच्या उद्देशाने हे गाणं माझ्यावर शूट केलं गेलं. सेटवर गेल्यावर काही क्षणातच मला होत असेलली गडबड लक्षात आली. स्वत: दिग्दर्शक असल्यामुळे दुसऱ्यांच्या कामात दखल घेतली नाही, तर स्वत: निर्माता असल्यामुळे आयत्या वेळी सेट सोडून गेल्यास होणाऱ्या नुकसानाबद्दलही माहिती होती, म्हणून तेही केलं नाही, असं सचिन पिळगावकरांनी फेसबुक पोस्टवर लिहिलं. फेसबुक यूझरने अपलोड केलेला सचिन पिळगावकर यांचा व्हिडिओ

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Embed widget