एक्स्प्लोर

Rubina Dilaik : 'बिग बॉस 14' विजेती रुबिना दिलैकच्या कारचा अपघात; पतीने दिली हेल्थ अपडेट

Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैकच्या गाडीला अपघात झाला असून तिच्या नवऱ्याने म्हणजेच अभिनव शुक्लाने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

Rubina Dilaik Car Accident : रुबिना दिलैक (Rubina Dilaik) ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारी रुबिना आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. अभिनेत्री रुबिना दिलैकच्या गाडीला अपघात झाला असून तिच्या नवऱ्याने म्हणजेच अभिनव शुक्लाने (Abhinav Shukla) ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 

अभिनव शुक्लाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये रुबिनाच्या कारचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. पण या अपघातात रुबिना थोडक्यात बचावली आहे. रुबिनाच्या कारला धडक देणाऱ्या चालकावर नाराजी व्यक्त करत अभिनवने मुंबई पोलिसांना कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. 

रुबिना दिलैकच्या गाडीला अपघात

रुबिना दिलैकच्या अपघाताची बातमी समजताच तिचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता रुबिनाच्या पतीने हेल्थ अपडेट डेट रुबिनाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. त्याने कारचे फोटो शेअर करत ट्वीट केलं आहे,"आज आमच्यासोबत घडलं आहे... उद्या तुम्हाला या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. ट्रॅफिक लाइट जंप करणाऱ्या मूर्खांपासून सावध रहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो हसत उभा होता. सविस्तर नंतर सांगेल. रुबिना कारमध्येच होती. आता तिची प्रकृती ठीक असून तिला डॉक्टरांकडे घेऊन जात आहे. मुंबई पोलिसांना कठोर कारवाई करण्याची विनंती". 

रुबिनाच्या अपघाताच्या बातमीने चाहते चिंतेत

अभिनवने रुबिनाच्या अपघाताबद्दल सांगताच तिचे चाहते चिंता व्यक्त करू लागले आहेत. रुबिना कशी आहे? कृपया काळजी घ्या, मला आशा आहे की तुम्ही दोघेही ठीक आहात. कृपया काळजी घ्या, तुम्हा दोघांसाठी प्रार्थना, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

रुबिनाबद्दल जाणून घ्या...

रुबिनाला 'शक्ति अस्तित्व के एहसास' या मालिकेच्या माध्यमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. त्यानंतर ती 'बिग बॉस 14'मध्ये झळकली. या कार्यक्रमातील तिची खेळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि ती या पर्वाची विजेती ठरली. त्यानंतर ती रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 12' या कार्यक्रमात सहभागी झाली. यानंतर डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा सीझन 10'च्या मंचावर तिने आपल्या नृत्याने सर्वांना वेड लावलं. 

संबंधित बातम्या

Rubina Dilaik : अप्सरा आली... व्हाईट आऊटफिट, रेड लिपस्टिक; रुबिनाचा लूक फॅन्टास्टिक

महत्त्वाच्या बातम्या

Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget