मुंबई : देशात गेल्या वर्षी कोरोनामुळे कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्या काळात रामानंद सागर यांची निर्मिती असलेली महामालिका रामायण छोट्या पडद्यावर प्रसारित करण्यात आली होती. आताही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत संचारबंदी वा नाईट कर्फ्यु लावण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावर रामायणाचे पुन्हा एकदा प्रसारण करण्याचा निर्णय झाला आहे. 


कोरोनावर नियंत्रण मिळत आहे असं वाटत असतानाच पुन्हा एकदा गेल्या वर्षी सारखी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पंधरा दिवसाची संचारबंदी लावण्यात आली असून इतर अनेक राज्यांत वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गेल्या वर्षी तब्बल 33 वर्षानंतर रामायण ही मालिका दुरदर्शन नॅशनल चॅनेलवर दाखवण्यात आली होती. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेने टीआरपीचे सर्व विक्रम मोडले होते. 


रामायणात सीतेचा अभिनय साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया टोपीवाला यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून रामायणाच्या प्रसारणावर आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, "मी खूप खुशीने आणि उत्साहाने ही माहिती देते की पुन्हा एकदा रामायण छोट्या पडद्यावर येत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही रामायण पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे." 


 






दीपिका चिखलिया टोपीवाला म्हणाल्या की, "ही मालिका केवळ माझीच नव्हे तर हजारो भारतीय परिवारांच्या जीवनाचा महत्वाचा हिस्सा आहे. रामायणातून ज्ञान मिळतंय. त्याला आपल्या समाजाचा एक भाग बनवला पाहिजे आणि या ज्ञानाचा लाभ भविष्यातील पीढीला दिला पाहिजे." 


महत्वाच्या बातम्या :