नवी दिल्ली : देशभरातील कोरोना संसर्गात पुन्हा एकदा वेगाने वाढ होत आहे. हळूहळू अनेक गोष्टींवर निर्बंध येताना दिसत आहे. अनेक राज सरकांरानी राज्यातील परिस्थिती पाहून अनेक निर्बंध लागू केले आहेत. नाईट कर्फ्यू, शनिवार व रविवार लॉकडाउन, मिनी लॉकडाउन सारख्या निर्बंध काही ठिकाणी लादले गेले आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येणारी सर्व स्मारकं, संग्रहालयं 15 मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यामुळे ताजमहाल, लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. 


केंद्रीय सांकृतिक व पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.  "कोरोना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता, भारतीय पुरातत्व खात्याअंतर्गत येणारी सर्व स्मारके 15 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सांकृतिक आणि पर्यटन मंत्रालयाने घेतला आहे", असं त्यांनी म्हटलं. 






Unlock 4 | 188 दिवसानंतर ताजमहाल पर्यटकांसाठी खुला, पाळावे लागणार नियम


कोरोनाच्या पहिल्या लाटेतही अनेक पुरातत्व खात्याअंर्गत येणारी स्मारकं आणि पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 188 दिवसानंतर म्हणजे 21 सप्टेंबर रोजी ताजमहाल लाल किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता.