एक्स्प्लोर

बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट

राम रहीमच्या शिक्षेवर आनंद व्यक्त करणाऱ्यांमध्ये कॉमेडियन किकू शारदाचाही समावेश आहे.

मुंबई : बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा झाल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला. बाबा राम रहीमची काळी कृत्यं जगासमोर आल्यानंतर, धर्माच्या आड सुरु असलेला धंदा बंद झाला आणि साध्वींना न्याय मिळाला, अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राम रहीमच्या शिक्षेवर आनंद व्यक्त करणाऱ्यांमध्ये कॉमेडियन किकू शारदाचाही समावेश आहे. राम रहीमला 20 वर्षांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेची घोषणा झाल्यानंतर कीकू शारदाने खिल्ली उडवणारं ट्वीट केलं आहे. किकू शारदाने लिहिलं आहे की, एन्जॉईंग अ पीसफूल चायनीज मिल विद नो मोनोसोडियम ग्लूटामेट. (Enjoying a peaceful Chinese meal with no monosodium glutamate.) https://twitter.com/kikusharda/status/902112429928202240 इथे मोनोसोडियम ग्लूटामेट म्हणजे MSG हे बाबा राम रहीमच्या संदर्भात लिहिलं आहे. राम रहीम स्वत:ला मेसेंजर ऑफ गॉड म्हणजे MSG म्हणत असे. कीकूच्या ट्वीटमध्ये ज्या मोनोसोडियम ग्लूटामेटचा उल्लेख आहे, ते बहुतांश वेळा चायनीज फूडमध्ये चव वाढवण्यासाठी मिसळलं जातं. किकू आणि बाबा राम रहीमचा वाद 'कॉमेडी नाईट्स विद कपिल' शोमध्ये एकदा किकू शारदाने राम रहीमचा वेश परिधान करुन त्याच्या एका सिनेमातील दृश्याची नक्कल केली होती. यानंतर बाबा राम रहीमचे समर्थक भडकले होते. किकूने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला होता. बाबा राम रहीमने किकू शारदाला नोटीसही पाठवली होती. यानंतर किकूवर गुन्हाही दाखल झाला होता. त्याला अटक करुन एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली होती. चंद्रमुखी चौटालाच्या ट्वीटनंतर किकूवर अभिनंदनाचा वर्षाव बाबा राम रहीमच्या अटकेनंतर कीकू शारदावर ट्विटवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याची सुरुवात एफआयआर फेम चंद्रमुखी चौटाला अर्थात कविता कौशिकने केली. कविताने बाबा राम रहीमच्या अटकेनंतर किकूला ट्वीट करुन शुभेच्छा दिल्या. तिचं ट्वीट तुफान रिट्वीट झालंच, शिवाय व्हायरल पण झालं. https://twitter.com/Iamkavitak/status/901077136630403072 कविताने किकूला टॅग करताना ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "किकू शारदा तुला माहित आहे ना, माझा आवडता डायलॉग कोणता आहे? आज...खुश तो बहुत होंगे तुम!" कविताने ट्वीट करताच किकूला शुभेच्छा देण्यासाठी ट्विटवर चढाओढ लागली. किकू आणि कविताचे फॉलोअर्स किकूला शुभेच्छा देऊ लागले.

महत्त्वाच्या बातम्या

Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Mohini - Premachi Filmy Kahaani Marathi Serial Track: सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं
'भूमिकेपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं, हे महत्त्वाचं'; ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेचं वक्तव्य चर्चेत
'भूमिकेपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं, हे महत्त्वाचं'; ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी, आता गौरव मोरे म्हणाला...

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Dart: वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
Jayant Patil: 'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
Rupali Chakankar and Ashok Kharat: सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
Aaditya Thackeray : 'हि कसली मर्दानगी, देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधलेत?' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंवरून आदित्य ठाकरेंचा प्रहार; एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका
'हि कसली मर्दानगी, देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधलेत?' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंवरून आदित्य ठाकरेंचा प्रहार; एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्यामुळं अवैध कामं करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत, निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा
तुकाराम मुंढे यांची निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा, मंत्री झिरवाळांकडून अखेर शब्द घेतलाच
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
Embed widget