एक्स्प्लोर

Rajeev Sen, Charu Asopa : राजीव सेन-चारू असोपामधील वाद मिटले? अभिनेत्रीने सोशल मीडियावर पुन्हा बदललं नाव!

Rajeev Sen, Charu Asopa : राजीव सेन आणि त्याची पत्नी चारू असोपा (Charu Asopa) यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता आणि ते कायदेशीररित्या वेगळे होत असल्याचे जाहीर केले होते.

Rajeev Sen, Charu Asopa : अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) प्रमाणेच तिचा भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) सध्या चर्चेचा भाग बनला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजीव सेन आणि त्याची पत्नी चारू असोपा (Charu Asopa) यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता आणि ते कायदेशीररित्या वेगळे होत असल्याचे जाहीर केले होते. पण, आता असे दिसतेय की, दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे. तसेच, दोघांमधील वाद देखील मिटले आहेत. चारू आणि राजीव यांनी पॅचअप केले आहे. नुकतेच चारूने इन्स्टाग्रामवर तिचे नावही बदलले आहे. दोघांनीही त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर, राजीवने चारूसोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राजीवने चारूसोबतचा एक क्यूट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना राजीवने गुलाबाची इमोजी पोस्ट केली आहे. राजीव आणि चारूचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोघांनी एकमेकांची चूक माफ करावी आणि या नात्याला पुन्हा संधी द्यावी, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. अखेर त्यांचा हा फोटो पाहून चाहते देखील खुश झाले आहेत.

चारूने बदलले नाव

दुसरीकडे चारू असोपाने देखील इन्स्टाग्रामवर तिचे आडनाव बदलले आहे. तिने आपले नाव बदलून चारू असोपा सेन असे केले आहे. तेव्हापासून तिचे आणि राजीवचे पॅचअप झाले असल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत. जेव्हा राजीवला त्याच्या आणि चारूच्या पॅचअपबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले की, 'माझ्या नवीन पोस्टमधील फोटोने सर्वकाही सांगितले आहे.' चारूने आडनाव बदलल्यानंतरच राजीवने हा फोटो शेअर केला आहे.

पाहा पोस्ट :

चारू आणि राजीव यांनी 9 जून 2019 रोजी रजिस्टर मॅरेज केले. त्यानंतर 16 जून रोजी त्यांचा गोवा येथे विविह सोहळा पार पडला.  गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चारूने एका मुलीला जन्म दिला होता. झियाना असं त्यांच्या मुलीचं नाव आहे.  दोघेही दररोज बाळासोबतचे फोटो शेअर करत असतात. चारू आणि राजीव यांनी त्यांच्या लग्नातील अडचणी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. राजीवने चारूवर पहिल्या लग्नाचे सत्य लपवल्याचा आरोप केला होता. तर, चारूने राजीवसोबतच्या नात्याला टॉक्सिक म्हटले होते.

हेही वाचा :

Charu Asopa- Rajeev Sen Separation : सुष्मिता सेनच्या भावाचा घटस्फोट? राजीव आणि चारु होणार विभक्त, चर्चांना उधाण

महत्त्वाच्या बातम्या

Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Subodh Bhave On Sai Tamhankar: 'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget