(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi : 'राम कृष्ण हरी!' बिग बॉस मराठीमुळे जपानी चाहता आळंदीमध्ये, परुषोत्तम दादा पाटील यांची घेतली भेट
Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीमुळे एक जपानी चाहता पुरुषोत्तम दादा पाटील यांची भेट घेण्यासाठी आळंदीमध्ये पोहचला.
Bigg Boss Marathi : कलर्स मराठी वाहिनीवर (Colors Marathi) 26 जुलै पासून बिग बॉस मराठीचा खेळ सुरु झाला. सुरुवातीला या खेळामध्ये एकूण 16 स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये आळंदीमधील किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील (Purushottam Dada Patil ) यांनी देखील बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) एन्ट्री घेतली. राम कृष्ण हरी म्हणतच त्यांनी घरात प्रवेश केला होता. पण पहिल्याच आठवड्यात त्यांना बिग बॉसच्या घराबाहेर पडावं लागलं होतं.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर घरातील परिस्थितीवर भाष्य केलं होतं. पण नुकतच त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पुरुषोत्तम दादा पाटील यांना भेटण्यासाठी एक चाहता थेट जपानवरुन आळंदीमध्ये पोहचला. इतकच नव्हे तर या त्यांच्या चाहत्याने बिग बॉस मराठीचे काही भाग देखील पाहिले असल्याचं यावेळी पुरुषोत्तम दादा पाटील यांनी सांगितलं आहे.
पुरुषोत्तम दादा पाटील यांनी शेअर केला व्हिडीओ
पुरुषोत्तम दादा पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडियावर क्यूहेसोबत हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं की, 'रामकृष्ण हरी…माझ्याबरोबर क्यूहे आहे. त्याला मी सांगतो की, तूही एकदा राम कृष्ण हरी म्हण. त्यावर क्युहे देखील राम कृष्ण हरी म्हणतो. पुढे पुरुषोत्तम दादा पाटील म्हणतात की, हा जपानचा आहे. त्याने बिग बॉस मराठीचे काही भाग पाहिले आहेत. ते पाहून तो मला आज आळंदीमध्ये भेटायला आला आहे. माझे मित्र ईश्वर आणि प्रियांका यांच्याबरोबर तो इथे आला आहे.
'हेच बिग बॉसच्या माध्यमातून साध्य झालं आहे...'
बिग बॉस मराठीच्या माध्यमातून काय साध्य झालं? असं जर कुणी मला विचारलं, तर मी म्हणतो की, ‘बिग बॉस’च्या माध्यमातून असे काही मित्र माझ्या जीवनात येत आहेत. हेच साध्य झालं. मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी, असं म्हणत पुरुषोत्तम दादा पाटील यांनी क्युहे सोबत फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram