Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate:  'सारेगमप लिटिल चॅमप्स' फेम मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate)  यांचा लग्नसोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशताच मुग्धा आणि प्रथमेश यांनी इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लघाटे कुटुंब मुग्धाचं स्वागत करताना दिसत आहेत. 


मुग्धाचं  सासरी 'असं' झालं स्वागत


मुग्धा आणि प्रथमेश यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुग्धाच्या स्वागतासाठी घराबाहेर फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत. तसेच तिचं आणि प्रथमेशचं औक्षण देखील करण्यात आलं. घरात प्रवेश करण्यापूर्वी प्रथमेश आणि मुग्धानं खास उखाणा देखील घेतला. 


मुग्धा आणि प्रथमेश यांचा भन्नाट उखाणा 


घरात प्रवेश करण्याआधी प्रथमेश आणि मुग्धानं भन्नाट उखाणा घेतला. प्रथमेशनं उखाणा घेतला,  “कपात ओतला चहा, चहाखाली ठेवली बशी, मुग्धा माझी गरीब गाय बाकी सगळ्या मारक्या म्हशी”. तर मुग्धानं उखाणा घेतला,“मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर अन् माहेरची खूण प्रथमेशचं नाव घेऊन कलाश्रीमध्ये प्रवेश करते नीना आणि उमेश लघाटे यांची सून!” 


पाहा व्हिडीओ:






थाटात पार पडला प्रथमेश आणि मुग्धा यांचा लग्नसोहळा


मुग्धा आणि प्रथमेश यांचा लग्नसोहळा  दापोली येथे पार पडला. लग्नसोहळ्यासाठी  मुग्धा आणि प्रथमेश  यांनी खास लूक केला होता.  पिवळ्या रंगाची साडी, सोनेरी रंगाचे दागिने असा लूक मुग्धानं लग्नसोहळ्यासाठी केला होता.  मुग्धा आणि प्रथमेश यांच्या लग्नसोहळ्याला त्यांच्या मित्रमैत्रीणींनी आणि कुटुंबानी हजेरी लावली होती. मुग्धा आणि प्रथमेश यांच्या लग्नसोहळ्याच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.


प्रथमेश आणि मुग्धा यांची लव्ह स्टोरी


मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाच्या  पहिल्या पर्वात सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्यान मोदक आणि मॉनिटर या नावाने ते ओळखले जात असत.पुढे या कार्यक्रमानंतर त्यांनी अनेक गाण्यांचे कार्यक्रम केले. या कार्यक्रमादरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले.


संबंधित बातम्या:


Mugdha Vaishampayan And Prathmesh Laghate: शुभमंगल सावधान! प्रथमेश आणि मुग्धा अडकले लग्नबंधनात,लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल