Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचा 31 डिसेंबर 2023 रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हास्याची नॉन स्टॉप पार्टी मिळणार आहे. 


हास्याची नॉनस्टॉप पार्टी!


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने या वर्षात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आणि आता वर्षअखेरीस अधिकाअधिक मनोरंजन करता यावे यासाठी 31 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस प्रेक्षकांना आवडलेली या वर्षभरातली प्रहसने (Skit) दिवसभर दाखवली जाणार आहेत आणि रात्री 9 वाजता हास्याची नॉनस्टॉप पार्टी, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.


नववर्षाच्या स्वागतासाठी जत्रेकरी सज्ज


संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. घराघरांत हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा 'सहकुटुंब हसू या' म्हणत, प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करत आली आहे. सर्वाधिक लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही मालिका आहे. 


वर्षभरातील तणावपूर्ण जीवनशैलीतून काही घटका निर्मळ आनंद घेता यावा म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' वर्षाअखेरीस संपूर्ण दिवस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही गोष्ट आनंद द्विगुणित करणारी आणि औत्सुक्याची असणार आहे.






'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील जत्रेकरी प्रेक्षकांचे नवीन वर्ष हसरे करण्यासाठी आता सज्ज झाली आहेत. 31 डिसेंबर 2023 रोजी  संपूर्ण दिवस 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि रात्री 9 वाजता हास्याची नॉनस्टॉप पार्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


कलाकारांना वेगळी ओळख देणारी 'हास्यजत्रा'


कॉमेडीचा बाज, अचूक टायमिंग आणि वन टेकमध्ये विनोदवीरांनी साकारलेल्या हास्याच्या या जादूला प्रेक्षकांनी यापूर्वीच डोक्यावर घेतले आहे. यातील फिल्टर पाड्याचा बच्चन असो किंवा कोळी वाड्याची रेखा, लॉली असो किंवा शंकऱ्या-शितलीची लव्ह स्टोरी. यातल्या सगळ्याच व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या आहेत. अभिनेता गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, समीर चौगुले , दत्तू मोरे, अभिनेत्री वनिता खरात, नम्रता संभेराव आदी कलाकारांना या हास्यजत्रेने एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. 


संबंधित बातम्या


Onkar Bhojane : अगं अगं आई.. पुन्हा ऐकायला मिळणार; प्रेक्षकांना खळखळून हसवायला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर आज येतोय ओंकार भोजने