Mugdha Vaishampayan And Prathmesh Laghate:  'सारेगमप लिटिल चॅमप्स' फेम मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate)  यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. या दोघांनी दापोली येथे लग्नगाठ बांधली. मुग्धा आणि प्रथमेश यांच्या लग्नसोहळ्याला त्यांच्या मित्रमैत्रीणींनी आणि कुटुंबानी हजेरी लावली होती. गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी देखील मुग्धा आणि प्रथमेश  यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. जुईली आणि रोहित यांनी मुग्धा आणि प्रथमेश यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


मुग्धा आणि प्रथमेश यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल ( Mugdha Vaishampayan And Prathmesh Laghate Wedding Photo)


जुईलीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मुग्धा आणि प्रथमेश हे एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहेत. तसेच रोहितनं देखील मुग्धा आणि प्रथमेश यांच्या लग्नसोहळ्यातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "खूप खूप शुभेच्छा! माऊ आता सौ मुग्धा प्रथमेश लघाटे झाली आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही."




मुग्धा आणि प्रथमेश यांचा खास लूक


लग्नसोहळ्यासाठी मुग्धा आणि प्रथमेशनं रॉयल लूक केला होता.  पिवळ्या रंगाची साडी, सोनेरी रंगाचे दागिने असा लूक लग्नसोहळ्याला केला होता. प्रथमेशनं लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता. 




काल प्रथमेश आणि मुग्धा यांचा हळदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या पहिल्या पर्वात मुग्धा आणि प्रथमेश सहभागी झाले होते. 2008 साली हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या कार्यक्रमादरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. त्यानंतर दोघांनी अनेक गाण्याचे कार्यक्रम केलं. मुग्धा कॉलेजमध्ये असल्यापासून प्रथमेशला तिला प्रपोज करण्याची इच्छा होती. पण एक दिवस कार्यक्रमाआधी तालीम सुरू असताना त्याने अखेर तिला विचारलं. पण तिने मात्र होकार द्यायला एक-दोन दिवस घेतले.






संबंधित बातम्या:


Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : लग्नाचं योग्य वय कोणतं? मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेने चाहत्यांना दिली माहिती