एक्स्प्लोर

प्राजक्ता माळीचा 'प्राजक्तप्रभा' काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला

प्राजक्ता माळी सांगते, कधी कुठे छापून याव्यात अथवा सोशल मीडियावर पोस्ट कराव्यात यासाठी नाही तर मी माझ्यासाठी कविता लिहीत होते. माझा काव्यसंग्रह येईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते.

मुंबई : प्राजक्ताचे नाव काढताच समोर येतात ती मंद सुगंधाची, मन प्रफुल्लित करणारी मोहक फुले. अशाच प्राजक्तला साजेसे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक अशा विविध माध्यमांमधून तिने कायमच तिच्या कलाकृतीचा सुगंध सर्वत्र दरवळवला. आता प्राजक्ता एका नवीन प्रवासासाठी सज्ज झाली आहे. ग्रंथाली प्रकाशित 'प्राजक्तप्रभा' काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्राजक्ता एक संवेदनशील कवयित्री म्हणून आपल्या भेटीला आली आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार श्री.प्रवीण दवणे यांच्या हस्ते झाले. या वेळी अध्यक्षस्थानी 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अमृता खानविलकर, पुष्कर श्रोत्री आणि दिग्दर्शक अभिजित पानसे उपस्थित होते. या व्यतिरिक्त प्राजक्ताचे नातेवाईक आणि सिनेसृष्टीतील मित्रपरिवारही तिला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होता. या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणखी एक घोषणा करण्यात आली ती म्हणजे 'प्लॅनेट मराठी'चा भाग असणाऱ्या 'प्लॅनेट टॅलेंट'मध्ये प्राजक्ता माळीचा सहभाग. 'प्लॅनेट मराठी'च्या परिवारात सहभागी झाल्याबद्दल या परिवाराकडून प्राजक्ताला एक खास भेट देण्यात आली. तिचा बालपणीपासून आजवरचा प्रवास या वेळी व्हिडिओद्वारे दाखवण्यात आला. तर प्राजक्तासह उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी 'प्राजक्तप्रभा'चे काव्यवाचन केले. 

'प्राजक्तप्रभा'बाबत ज्येष्ठ साहित्यिक, कवी प्रवीण दवणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, ते म्हणाले, ''प्राजक्ताला आपण एक उत्कृष्ट अभिनेत्री, नृत्यांगना म्हणून ओळखतोच. 'प्राजक्तप्रभा'च्या माध्यमातून ती एक कवयित्री म्हणून आपल्या समोर आली आहे. प्राजक्ताला कलाकारासोबतच कवयित्री का व्हावेसे वाटले याचे उत्तर 'प्राजक्तप्रभा'मध्ये दडले आहे. तिचे हळवेपण, संवेदनशीलता या काव्यसंग्रहातून स्पष्ट जाणवते. या झगमगत्या जगापलीकडेही कलावंतांना मन असते, भावना असतात. या भावनांना प्राजक्ताने काव्यस्वरूपात आपल्या समोर आणले आहे. प्राजक्ताच्या या नवीन प्रवासासाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा. पारिजातकाच्या फ़ुलाप्रमाणेच 'प्राजक्तप्रभा'चा सुगंधही रसिकांच्या मनात कायम दरवळत राहील.''

आपल्या या नवीन प्रवासाबद्दल प्राजक्ता माळी सांगते, ''कधी कुठे छापून याव्यात अथवा सोशल मीडियावर पोस्ट कराव्यात यासाठी नाही तर मी माझ्यासाठी कविता लिहीत होते. माझा काव्यसंग्रह येईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. योगायोगाने हे सर्व जुळून येत आहे. त्यामुळे हा तुमच्याप्रमाणेच मलाही हा एक सुखद धक्का आहे आणि म्हणूनच विशेष आनंदही आहे. संग्रहातील कविता मराठी, हिंदी आणि इंग्रजी असून त्या अत्यंत साध्या आणि सोप्या आहेत. अजिबातच क्लिष्ट नाहीत; त्यामुळेच त्या प्रेक्षकांना आपल्याशा वाटतील, भावतील, आवडतील अशी आशा आहे. आजवर प्रेक्षकांनी माझ्या अभिनयावर, नृत्यावर भरभरून प्रेम केले. वेळोवेळी मला प्रतिक्रियाही दिल्या. मला आशा आहे की, 'प्राजक्तप्रभा'लाही रसिक उत्स्फूर्त प्रतिसाद देतील. तसेच माझ्यावर, माझ्या कवितांवर विश्वास दाखवणाऱ्या 'ग्रंथाली'सारख्या नामांकित प्रकाशनाचे तसेच 'प्लॅनेट मराठी'च्या कुटुंबात मला प्रेमाने सहभागी करून घेणाऱ्या अक्षय बर्दापूरकर यांचे मी मनःपूर्वक आभार मानते. ''

'प्लॅनेट मराठी'तील सहभाग आणि कवयित्री म्हणून आपल्या समोर आलेल्या प्राजक्ता माळीबद्दल 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' मालिका, चित्रपट, नाटक अशा अभिनयाच्या विविध माध्यमांमधून प्राजक्ताने आपले अभिनयकौशल्य यापूर्वीच प्रेक्षकांना दाखवले आहे. एक अभिनेत्री म्हणून ज्याप्रमाणे तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याप्रमाणेच एक कवयित्री म्हणूनही ती रसिकांचे प्रेम मिळवेल. आज ती 'प्लॅनेट मराठी'च्या परिवारात सहभागी होत आहे. 'प्राजक्तप्रभा' आणि 'प्लॅनेट टॅलेंट'च्या माध्यमातून प्राजक्ता एका नवीन प्रवासाची सुरुवात करत आहे. यासाठी तिला खूप शुभेच्छा. आम्हाला फार अभिमान आहे, अशी अष्टपैलू अभिनेत्री आमच्या परिवारात सामील होत आहे.''

महत्त्वाच्या बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Maharashtrachi HasyaJatra: पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Embed widget