Unch Maza Zoka : झी मराठीच्या (Zee Marathi) मंचावर प्रेक्षकांना नेहमी प्रेरणा देणारे कार्यक्रम सादर होत असतात. या वर्षी देखील 'मला अभिमान आहे' हे ब्रीद घेऊन स्त्री कर्तृत्वाचा सन्मान म्हणून ‘उंच माझा झोका' हा नेत्रदीपक पुरस्कार सोहळा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'उंच माझा झोका' (Unch Maza Zoka) पुरस्काराचे यंदाचं हे आठव वर्ष आहे. आपल्या कार्याने समाजाला सुदृढ वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा यावेळी गौरव करण्यात येईल.
'उंच माझा झोका' या पुरस्कार सोहळ्याचे या वर्षाचे खास आकर्षण म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर सांभाळणार आहेत. 'उंच माझा झोका' या पुरस्कार सोहळ्याचा प्रोमो व्हिडीओ नुकताच झी-मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, क्रांती रेड ही पंकजा मुंडे यांना म्हणते की, 'कदाचित या येथे भाषण करणार आहेत.' त्यानंतर पंकजदा मुंडे या म्हणतात, 'मी भाषण नाही तर तुझ्यासोबत सूत्रसंचालन करणार आहे' वेगवेगळ्या अभिनेत्री या पुरस्कार सोहळ्यात नृत्य सादर करणार असून अनेक क्षेत्रातील दिग्गज या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत, असं प्रोमो व्हिडीओमध्ये दिसत आहे.
पाहा प्रोमो:
पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर ह्या दोघींची जुगलबंदी ह्या कार्यक्रमात रंगत आणेल ह्यात शंकाच नाही. सोबतच कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान आणि कलाकारांचे धमाकेदार नृत्याविष्कार अनुभवण्यासाठी पाहायला विसरू नका 'उंच माझा झोका' पुरस्कार 2022 झी मराठी वर 28 ऑगस्टला संध्याकाळी सात वाजता.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: