Dobaaraa Box Office Collection Day 3 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही सध्या बॅक टू बॅक वेगवेगळ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तापसीच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात. नुकताच तापसीचा दोबारा (Dobaaraa) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अनुराग कश्यपनं (Anurag Kashyap) या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी तापसी आणि अनुराग ही जोडी  'मनमर्जियां' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. आता चार वर्षांनंतर अनुराग आणि तापसी पुन्हा प्रेक्षकांसमोर एक नवी गोष्ट 'दोबारा' चित्रपटाच्या माध्यमातून मांडत आहेत. या चित्रपटाला वीकेंडला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन....


एक वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, रिलीज झाल्यानंतर तीसऱ्या दिवशी या चित्रपटानं 1.10 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं पहिल्या दिवशी  72 लाख कमावले तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 1.02 कोटींची कमाई केली. तीन दिवसांमध्ये या चित्रपटानं जवळपास तीन कोटी कमावले. दोबारा हा चित्रपट एका स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये तापसी आणि राहुल भट्ट यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तापसीचा शाबास मिथू हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. पण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. ओटीटीवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 


'दोबारा'ला देखील नेटकऱ्यांनी केलं होतं बॉयकॉट


दोबारा चित्रपटाला बॉयकॉट करा, अशी मागणी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये तापसी आणि अनुराग यांनी केली होती. त्यानंतर त्यांची इच्छा नेटकऱ्यांनी पूर्ण केली. बॉयकॉट दोबारा हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी वेगवेगळे मीम्स तयार करुन या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर केली. सध्या अभिनेत्री तापसी पन्नूकडे आगामी अनेक चित्रपटांची रांग लागली आहे. तापसी शाहरूख खानबरोबर ‘डंकी’ या चित्रपटातसुद्धा दिसणार आहे. तर, राजकुमार रावसोबतही ती एका चित्रपटात झळकणार आहे. तापसी राजकुमार आणि शाहरुखसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: