Onkar Bhojane on Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाचं नवं पर्व नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येण्याआधीपासूनच चाहते त्यांचा लाडका विनोदवीर ओंकार भोजनेची (Onkar Bhojane) या कार्यक्रमात एन्ट्री व्हावी, अशी प्रतीक्षा करत होते. 


'त्या' प्रोमोमुळे चाहत्यांचा गोंधळ


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रोमोमध्ये चक्क ओंकार भोजने स्कीटचं सादरीकरण करताना दिसत आहे. सोनी मराठीनेदेखील या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रोमो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"हास्यजत्रेत पुन्हा एकदा ओंकार भोजनेची धमाल... पाहा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा - सहकुटुंब हसू या'- दिवाळी स्पेशल". 






ओंकार भोजने स्कीटमध्ये म्हणत आहे,"माझं असचं आहे मला वाटलं तर मी येतो नाहीतर येत पण नाही. कधी नव्हे ते एकदा आलो आहे तर सगळे माझ्या अंगावर येऊ नका". ओंकार भोजनेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम चांगलाच गाजवला आहे. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या लाडक्या विनोदवीराची आठवण येत आहे. 


ओंकारच्या प्रोमोवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव


ओंकार भोजनेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रोमो व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अरे कडक आपला भाऊ पुन्हा आला, ओंकार नुसता धिंगाणा, ओंकारमुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला, आमचा भोजने पुन्हा हास्यजत्रेत परत आला, लयभारी आता खरी मजा येणार, वेलकम बॅक, एक नंबर, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


ओंकार भोजने खरंच पुन्हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात दिसणार? (Onkar Bhojane Entry in Maharashtrachi Hasyajatra)


ओंकार भोजनेची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात एन्ट्री झालेली नाही. त्याच्या आगामी 'एकदा येऊन तर बघा' (Ekda Yeun Tar Bagha) या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ओंकार भोजने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने एक स्कीटदेखील सादर केलं. ओंकारचा हा सिनेमा 8 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.


संबंधित बातम्या


Maharashtrachi Hasya: आता नुसता धिंगाणा होणार, हास्यजत्रेत ओंकार भोजनेची पुन्हा एन्ट्री; स्किटमध्ये म्हणाला "मला वाटलं तर मी येतो, नाही तर मी येत नाही"