Maharashtrachi Hasya: महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या कार्यक्रमातील कलाकार त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतात. अभिनेता  ओंकार भोजने (Onkar Bhojane) हा देशील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. पण ओंकारनं काही दिवसांपूर्वी हा शो सोडला होता. आता ओंकारची महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एन्ट्री झाली आहे. नुकताच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


ओंकार भोजनेची एन्ट्री


नुकताच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रोमोमध्ये ओंकार भोजने हा महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात स्किट सादर करताना दिसत आहे. या स्किटमधील ओंकारचे जोक्स ऐकून सर्वजण खळखळून हसताना दिसत आहेत. 


ओंकारच्या डायलॉग्सनं वेधलं लक्ष


 महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या प्रोमोमधील ओंकार भोजनेच्या डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  प्रोमोमध्ये दिसत आहे की, ओंकार स्किटमध्ये म्हणतो, "माझं असंच आहे, मला वाटलं तर मी येतो, नाही तर मी येत नाही".


पाहा प्रोमो:






म्हणून ओंकारनं सोडला होता शो


हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओंकारला विचारण्यात आला होता. त्यावेळी ओंकारनं उत्तर दिलं होतं, 'सगळं छान सुरु होतं, पण मला पुढे दोन चित्रपटांसाठी थांबायचं होतं. त्यांना पण अॅडजेस्टमेंट करावी लागणार होती. माझ्या प्रकृतीच्या पण काही तक्रारी होत्या. तेव्हा सुट्टी घेतली ती कायमचीच. नंतर मी फू बाई फू मध्ये काम केलं. मी या सगळ्यामधून शिकत आहे.' 


 बॉईज-2,बॉईज- 3, घे डबल यांसारख्या चित्रपटांमध्ये ओंकारनं काम केलं आहे. ओंकारच्या अभिनयाला त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. तसेच ओंकारचा 'सरला एक कोटी' हा चित्रपट देखील काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.  या चित्रपटात  ईशा केसकर, छाया कदम यांनी देखील  प्रमुख भूमिका साकारली. आता ओंकारच्या  महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामधील स्किट पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Onkar Bhojane : ओंकार भोजने 'कोकण हार्टेड गर्ल'चा मोठा चाहता; म्हणाला,"मला तिचा स्वभाव..."