Maharashtrachi Hasyajatra : दिवाळी (Diwali 2023) म्हटलं की फटाके हे आलेच. पण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) ही टीम वर्षभर हास्यरुपी फटाके वाजवत असते. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील घराघरांत हास्याचे आवाज होत असतात. 


'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे लेखक सचिन गोस्वामी म्हणाले की,"वर्षभर आम्ही स्कीटरुपी फराळ देत असतो. आमचा फराळ खूप हेल्दी आहे. वेगवेगळ्या वयोगटातील मंडळी, कुटुंबीय हा फराळ दररोज खात असतात. मन:स्वास्थ्यासाठी हा फराळ उत्तम आहे". 


दिवाळीतील फराळाच्या ताटाप्रमाणे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाची टीम आहे. प्रत्येकाची चव उत्तम आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. प्रत्येकामध्ये वेगळं टॅलेंट आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सचिन गोस्वामींनी फराळातला कोणता पदार्थ कोणत्या विनोदवीरासारखा आहे हे सांगितलं आहे. 


हास्यजत्रेतला रव्याचा लाडू कोण?


सचिन गोस्वामी म्हणतात, रव्याचा लाडू अरुण कदम आहे. त्यामागचं कारण सांगत गोस्वामी म्हणाले,"रव्याचा लाडू चविष्ट आहे. सगळ्यांना आवडतो. पण हा फोडून कसा खायचा हे कळत नाही. फोडल्यावर तो कसा फुटेल हे कोणी सांगू शकत नाही". 


हास्यजत्रेतल्या टीममधल्या चकल्या कोण याबद्दल बोलताना सचिन गोस्वामी म्हणाले,"आमच्याकडे दोन-तीन चकल्या आहेत. नम्रता संभेराव, समीर चौघुले (Samir Choughule), पृथ्विक प्रताप, प्रसाद खांडेकर या चकल्या आहेत. चकलीचे जेवढे वेटूळे आहेत तेवढे त्यांचे रुपरंग आहेत. कुठून सुरुवात करून कुठे संपवावं याचा अंदाज येत नाही. ते अनंत आहेत. चक्राकार आहेत". 


वनिता खरात आहे बदाम खोचलेला बेसनाचा लाडू...


प्रियंका हांडे, दत्तू, विराज हे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या टीममधील शंकरपाळी आहेत. शंकरपाळ्यांशिवाय फराळाचं ताट पूर्ण होऊ शकत नाही. तर बेसन लाडू कोण हे सांगत गोस्वामी म्हणाले,"ईशा डे, चेतना भट्ट, रसिका वेंगुर्लेकर हे बेसन लाडूचे प्रकार आहेत. तर बेसनाच्या लाडूवर बदाम खोचला की तो वनिताचा लाडू होतो".


टीममधले अनारसे कोण?


फराळाच्या ताटातली करंजी श्याम आहे. सारणात अनेक पदार्थांचा समावेश करण्यात आलेला असतो. करंजीचा टायमिंग फार महत्त्वाचा असतो. गौरव मोरे (Gaurav More), ओंकार भोजने (Omkar Bhojane) हे हास्यजत्रेतले अनारसे आहेत. रोहित माने चिवड्यातली मिरची आहे. प्रिया चिवडल्यातले शेंगदाणे, काजू आहे. 
 
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'टीममधला कोण कोणता फटाका? 



  • रॉकेट - समीर चौगुले

  • सुतळी बाँब - हास्यजत्रेतल्या सर्व महिला विनोदवीर

  • भुईचक्र - निखिल बने, दत्तू, प्रियंका हांडे, विराज

  • पाऊस - गौरव मोरे, अरुण कदम, श्यामसुंदर राजपूत, हेमंत पाटील, रोहित माने

  • लवंगी - म्युझिक टीम

  • आपटी बाँब - सचिन गोस्वामी, सचिन मोटे (सचिन मोटे म्हणाले,"मी आणि सचिन हे आपटी बार आहोत. पाच वर्षे आपटतोय".)

  • फुलबाजी - सोनी मराठी चॅनल

  • नागगोळी - नुसता धूर करणाऱ्या स्कीट

  • फँन्सी फटाका - ओंकार राऊत

  • प्रसाद खांडेकर - लक्ष्मी बॉम्ब


संबंधित बातम्या