Arbaz Patel :  अरबाज पटेल (Arbaz Patel) आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli) यांच्या नात्याविषयी बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) आणि बाहेर सध्या बरीच चर्चा सुरु आहे. त्यातच अरबाजतची गर्लफ्रेंड लीझा हिच्या पोस्ट आणि तिचं आरबाजचं नातं यामुळे बराच संभ्रमही निर्माण झालाय. बिग बॉसच्या घरातले टास्क, राडे प्रत्येक गोष्टीमध्ये अरबाज निक्कीची बाजू घेताना तिला सावरताना दिसतोय. या सगळ्यावर त्याची गर्लफ्रेंडही सोशल मीडियावर व्यक्त होतेय. 


याचदरम्यान घरातल्या स्पर्धकांच्या वागण्यावर बाहेरही अनेक कलाकार व्यक्त होताना दिसतायत. त्यातच आता अरबाजच्या एका मैत्रीणीने त्याच्याविषयी एक मोठा खुलासा केला. विशेष म्हणजे अरबाज जेव्हा स्प्लिट्सव्हिला या कार्यक्रमात सहभागी झाला होता, त्यावेळी त्याचं नाव या व्यक्तीसोबत जोडलं गेलं होतं. या शोमध्ये अरबाज आणि नायरा अहुजा हे दोघेही पार्टनर होते. 


नायराचे अनेक मोठे खुलासे


दरम्यान नायराने नुकतीच टेली मसाला या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. त्यामध्ये तिने अरबाज आणि निक्की हे दोघेही नाटक करत असल्याचंही म्हटलं आहे. तसेच तिने लीझाविषयीही अनेक मोठे खुलासे केले आहेत. नायराने म्हटलं की, लीझा तिच्या सोशल मीडियावरील चॅटमध्ये म्हणत होती की, तो कार्यक्रम स्क्रिप्टेड आहे, त्यामध्ये लव्ह अँगल तर करावाच लागतो. तसंच ती दुसऱ्या कुणाला तरी सांगत होती की, त्याने त्याच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत, याचं मला खूप दु:ख होतंय. त्यात ती कधी म्हणते की माझं लग्न झालंय, कधी नाही म्हणते. 


'ही पीआर स्ट्रॅटजी'


पुढे नायराने म्हटलं की, जेव्हा आम्ही ‘स्प्लिट्सव्हिला’मध्ये होतो, त्यावेळी अरबाजचं लग्न झाल्याच्या अफवा पसरवल्या होत्या. इतकंच नव्हे तर लीझा प्रेग्नंट असल्याचंही त्यांनी माझ्यापर्यंत पोहचवलं होतं. ही सगळी त्याच्या पीआरची स्ट्रॅटेजी होती. लग्न आणि मुलं या सगळ्यावर यांची प्रसिद्धी होत असते, त्यासाठी हा सगळा गेमप्लॅन बनवण्यात आलाय. त्यामुळे तो जेव्हा घराबाहेर येईल ते दोघे पुन्हा एकत्र येतील आणि या सगळ्यात मी आणि निक्की आम्ही दोघीच खूप मूर्ख दिसणार आहोत.                      


ही बातमी वाचा : 


Malaika Arora Father Death : 'मी खूप थकलोय...'; सहाव्या मजल्यावरुन उडी मारण्याआधी वडिलांचा मुलींना फोन, आत्महत्येचं धक्कादायक कारण आलं समोर