Malaika Arora Father Death :  अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिच्या वडीलांनी आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आल्यानंतर बॉलीवूड सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली. दरम्यान अनिल अरोरा (Anil Arora Death) हे मलायकाचे सावत्र वडील असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास अनिल अरोरा यांनी गच्चीवरुन उडी मारत स्वत:चं आयुष्य संपवलं. 


दरम्यान अनिल अरोरा यांनी आत्महत्या करण्याआधी त्यांच्या दोन्ही लेकींशी संवाद साधला होता. त्यांनी मलायका आणि अमृता या दोघींना फोन करुन मी आजारी असून खूप थकलो असल्याचं म्हटलं होतं. अनिल अरोरा आणि त्यांची पत्नी वांद्रे पश्चिमेकडील आयेशा मनोर या इमारतीत मागील अनेक वर्षापासून राहत आहेत.


दिग्गज मंडळी सांत्वनासाठी अरोरांच्या घरी 


अनिल अरोरा यांच्या निधनाची बातमी समजताच चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. त्याचप्रमाणे मलायकाचा एक्स नवरा आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड हे दोघेही मलायकाच्या घरी पोहचले. अनेक दिग्गज कलाकार सकाळपासूनच अरोरा कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत आहेत. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी एडीआर दाखल करुन घेतली आहे. तसेच त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या विलेपार्ले पश्चिमेकडे कुपर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 


कोण होते अनिल अरोरा 


मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. त्यांचे कुटुंब भारताच्या सीमेवर वसलेल्या फाजिल्का येथील रहिवासी होते. अनिल अरोरा यांनी इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये काम केले होते. अनिल अरोरा यांनी मल्याळी ख्रिश्चन कुटुंबातील जॉयस पॉलीकार्पशी लग्न केले.  मलायका 11 वर्षांची असताना अनिल अरोरा आणि जॉयस यांचा घटस्फोट झाला असल्याचे मलायकाने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते. 


मलायका अरोरा पुण्याहून मुंबईसाठी रवाना...


अभिनेत्री मलायका अरोरा ही काही कामानिमित्ताने पुण्यात होती. या घटनेची माहिती मिळताच मलायका तातडीने मुंबईसाठी रवाना झाली. या घटनेची माहिती मिळताच अरोरा कुटुंबातील सदस्यांना धीर देण्यासाठी मलायकाचा पूर्व पती आणि अभिनेता अरबाज खान हा  अरोरा यांच्या घरी दाखल झाला.                                    


ही बातमी वाचा : 


चित्रपटात जास्त काम न करताही कोट्यवधींची कमाई; मलायका अरोराची संपत्ती किती?


Malaika Arora Father Death : मलायका अरोराच्या वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल, इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले