Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi new Season) पहिल्या दिवसापासून एकच नाव चर्चेत आहे. निक्कीच्या राड्यांची घरातल्यांनीच नाही तर प्रेक्षकांनी सुद्धा दखल घेत त्यावर वेळोवेळी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिचं घरातील इतर सदस्यांसोबतचं बोलणं यावर वारंवार आक्षेपही नोंदवला जातोय. त्यामुळे तिच्या वागण्यावर घरातल्यांसोबत प्रेक्षकांनाही वेळोवेळी नाराजी व्यक्त केलीये.
दरम्यान निक्कीच्या स्वभावाची घरात वारंवार चर्चा होतच असते. अशीच चर्चा होत असताना टीम एमधल्या सदस्यांनी बोलताना निक्की इमोशनल असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे ज्यावरुन निक्कीने मागच्या आठवड्यात राडे घातले होते, तिच्या त्या शिक्षेचीही जोरदार चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. बिग बॉस मराठी'च्या मागील भाऊच्या धक्क्यावर निक्कीला पूर्ण आठवड्याची भांडी घासायची ही शिक्षा रितेश भाऊंनी दिली होती. तिची घरातली वागणूक पाहून घरामधील इतर सदस्यांना देखील तिची ही शिक्षा बरोबर वाटत होती.
'निक्की खूप इमोशनल'
आजच्या UNSEEN UNDEKHA मध्ये तुम्ही पाहू शकता की, घरातले टीम 'A' मधील अभिजित , पॅडी , सूरज , अंकिता आणि आर्या हे सगळॆ जण गार्डन एरियात बसून निक्की विषयी बोलताना दिसत आहेत. पॅडी म्हणाले," निक्की दाखवते की तिला काही नाही वाटले पण ती थोडी मनाने हलली आहे. तिचे बोलणे पण वेगळे वाटते. त्यावर अभिजित म्हणाला , " काल मी बसून गाणे गायले ना. तेव्हा ती रडली आणि परत आता मध्ये जाऊन देखील ती रडली. ती खूप इमोशनल आहे .
'तू तिने केलेले काम चेक करायला पण जातोस?'
सगळ्यामध्ये सूरज म्हणाला की, " ती तुझी मैत्रीण आहे. ती तुझ्याकडे आणि अरबाज कडेच बोलायला जाते . त्यावर अभिजित म्हणाला ," निक्की काम चांगले करते पण सगळे बेसिंग वगरे स्वच्छ ठेवते. त्यावर अंकिता अभिजितला म्हणाली ," तू तिने केलेले काम चेक करायला पण जातोस? अभिजीतचं एक आहे, तो निक्कीवर काही बोलला तर लेगच माझ्याकडे बघतो. जर मला पेन आणि पेपर दिला ना तर मी खूप काही लिहून ठेवलं असतं. जसे की, तू या वेळी या दिवशी हे वाक्य तू निक्कीला बोललास. त्यावर अभिजित म्हणाला ," अंकिता रेडी असते माझ्याबद्दल सगळं नोट करायला. ती गाईड घेऊन बसते आणि सगळे लिहून ठेवते .
ही बातमी वाचा :
Ganeshostav 2024 : आजी आणि नातवाचं बाप्पासोबतचं खास नातं, वंदना गुप्तेंचं स्पेशल गाणं