Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या कार्यक्रमाचा दिमाखदार महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आहे. विनोदवीर मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) या पर्वाचा विजेता ठरला आहे. मुनव्वर आणि अंकिता लोखंडेमध्ये (Ankita Lokhande) चांगलीच लढत रंगली होती. अखेर यात मुनव्वर फारुकीने बाजी मारली. 'बिग बॉस 17'मध्ये अंकिताने चौथा क्रमांक पटकावला आहे. हार के जीतने वाले को बाजीगर कहते है, अगदी याच पद्धतीने अंकिता लोखंडे खऱ्या अर्थाने बाजीगर ठरली आहे.


मुनव्वरवर भारी पडली अंकिता लोखंडे


मुनव्वर फारुकी आणि अंकिता लोखंडे यांच्या एक आठवड्याच्या मानधनात जमीन अस्मानाचा फरक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अंकिता लोखंडेला दर आठवड्याचे 15 लाख रुपये ऑफर करण्यात आले होते. तर दुसरीकडे मुनव्वर फारुकीला मिळणारं मानधन हे अंकितापेक्षा खूपच कमी होतं. प्रत्येक आठवड्याचे मुनव्वरला फक्त सात लाख रुपये ऑफर करण्यात आले होते. 'बिग बॉस 17' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंकिता लोखंडेला 1 कोटी 80 लाख रुपये मिळाले. तर दुसरीकडे मुनव्वरला फक्त 84 लाख रुपये मिळाले आहेत. 


मुनव्वरने किती रुपये जिंकले? 


मुनव्वर फारुकीला दिमाखदार ट्रॉफीसह रोख रक्कम 50 लाख रुपये मिळाले आहेत. 50 लाख रुपये जिंकूनही मुनव्वर आणि अंकिताची बरोबरी होऊ शकत नाही. जिंकलेली रक्कम आणि 'बिग बॉस 17'च्या घरातील कमाई मिळून मुनव्वरचे 1 कोटी 34 लाख रुपये होतात. तर दुसरीकडे अंकिता लोखंडेची एकूण कमाई 1 कोटी 80 लाखांच्या आसपास आहे. 


अंकिता लोखंडे बिग बॉस 17'मधली सर्वात महागडी स्पर्धक!


अंकिता लोखंडे बिग बॉस 17'मधली सर्वात महागडी स्पर्धक होती. 200 कपड्यांसह अभिनेत्रीने 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश केला आहे. या कार्यक्रमाच्या ग्रँड प्रीमियरला भाईजान सलमान खाननेही याचा उल्लेख केला. भाईजानसोबत बोलताना अंकिता म्हणालेली,"बिग बॉस'मधील प्रत्येक प्रसंग आणि खेळ लक्षात घेऊन मी कपडे आणले आहेत". 


अंकिता लोखंडेबद्दल जाणून घ्या... (Who is Ankita Lokhande)


अंकिता लोखंडेला 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या मालिकेच्या माध्यमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. या मालिकेत ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत (Sushant Singh Rajput) स्क्रीन शेअर करताना दिसली होती. या मालिकेच्या सेटवर सुशांत आणि अंकिता यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. पण काही कारणांनी त्यांचं नातं पुढे जाऊ शकलं नाही आणि त्यांचा ब्रेकअप झाला. अंकिता लोखंडेने 2018 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'बागी 3','मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमांत अंकिताच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. अंकिता लोखंडेने साकारलेली अर्चना आज घराघरांत लोकप्रिय आहे. आजही तिची क्रेझ कायम आहे. आजही तिची क्रेझ कायम आहे. अंकिता लोखंडे या पर्वाची विजेती व्हावी अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे.


संबंधित बातम्या


Munawar Faruqui Net Worth : 60 रुपये पहिली कमाई अन् आज आहे कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या 'बिग बॉस 17'चा विजेता मुनव्वर फारुकीच्या संपत्तीबद्दल