Salman Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बिग बॉस 17 (Bigg Boss-17) शो संपला आहे. मुनाव्वर फारुकीने (Munawar Faruqui) या सीझनचा विजेता ठरला आहे. ट्रॉफीसोबतच मुनव्वरला 50 लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे. मुनव्वर हा शोचा विजेता ठरला आहे तर अभिषेक कुमार (Abhishek Kumar) फर्स्ट रनर अप ठरला आहे. अभिषेक या शोचा विजेता न झाल्याबद्दल अनेकजण खंत व्यक्त करत आहेत. अशातच आता अभिषेक मल्हान (Abhishek Malhan) यानं एक ट्वीट केलं आहे. त्याच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


अभिषेक मल्हान म्हणतो, "अभिषेक नावाची व्यक्ती सलमान भाईसमोर कधीही जिंकू शकत नाही"


बिग बॉस ओटीटी 2 चा रनरअप अभिषेक मल्हाननं अभिषेक कुमारच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिषेकचा पराभव झाल्यानंतर आता अभिषेक मल्हाननं ट्वीट शेअर केलं आहे. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'अभिषेक नावाची व्यक्ती सलमान भाईसमोर कधीही जिंकू शकत नाही. आयुष्मान नावाने बिग बॉस 18 मध्ये प्रवेश करावा.' 






अभिषेक जिंकू शकला नाही बिग बॉसची ट्रॉफी 


बिग बॉस ओटीटी- 2 (Bigg Boss OTT Season 2) शोमधील अभिषेक मल्हान हा स्ट्राँग स्पर्धक होता. शोच्या सुरुवातीपासूनच अभिषेक या सीझनची ट्रॉफी घेईल असं वाटत होतं. पण वाइल्ड कार्ड शोमध्ये एल्विश यादव आल्यानं अभिषेकचे ट्रॉफी स्वप्न भंगले. एल्विश यादव ओटीटी-2 या कार्यक्रमाचा विजेता ठरला आणि अभिषेक उपविजेता ठरला. 


जाणून घ्या अभिषेकबाबत...


अभिषेक कुमार हा प्रसिद्ध यु्ट्यूबवर आहे. अभिषेक हा फुकरा इंसान या नावाने प्रसिद्ध आहे. अभिषेक हा गेमिंग आणि व्लॉगिंगही करतो. अभिषेकनं एल्विश यादवसोबत टेम्पटेशन आयलंड हा शो देखील होस्ट केला होता. त्याचबरोबर तो अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही दिसत आहे.


मुनव्वर ठरला बिग बॉस-17 चा विजेता


मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि मन्नार चोप्रा हे बिग बॉस-17 या कार्यक्रमाचे टॉप-3 स्पर्धक ठरले. यापैकी मुनव्वर फारुकीनं बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


 Munawar Faruqui Exclusive : 'Bigg Boss 17'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीची एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया;"तुमच्या पाठिंब्यामुळे ट्रॉफी डोंगरीत आली"