Munawar Faruqui Net Worth : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रमाचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला आहे. विनोदवीर मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. पहिली कमाई 60 रुपये असणारा मुनव्वर आज कोट्यधीश आहे.


मुनव्वरचा जन्म गुजरातमधील जूनागढमध्ये झाला आहे. पाचवीत असताना आर्थिक अडचणींमुळे मुनव्वरला शिक्षण सोडावं लागलं होतं. शाळा सोडल्यानंतर त्याने समोसे, चकल्या बनवण्याचं आणि विकण्याचं काम केलं. त्याची पहिली कमाई फक्त 60 रुपये होती. पण मेहनतीच्या जोरावर त्याने स्वत:ला सिद्ध केलं. 


मुनव्वर फारुकीची नेटवर्थ जाणून घ्या (Munawar Faruqui Net Worth)


मुनव्वर फारुकीची एकूण संपत्ती आठ कोटींच्या आसपास आहे. एका कॉमेडी शोसाठी तो 3 ते 4 लाख रुपयांचं मानधन घेतो. तर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तो दर महिन्याला आठ लाखांपेक्षा अधिक कमाई करतो. इंस्टाग्रामवरील एका स्पॉनसर्ड पोस्टचे तो 15 लाख रुपये चार्ज करतो. आता विजेतेपद पटकावल्यानंतर अभिनेत्याच्या एकूण संपत्तीत आणखी वाढ झाली आहे.






मुनव्वरला महागड्या गाड्यांची आवड (Munawar Faruqui Car Collection)


मुनव्वर फारुकीला महागड्या गाड्यांची आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये Toyota Fortuner (33.4-51.4 लाख रुपये), Mahindra Scorpio N (15.4-20.5 लाख रुपये) आणि MG Hectorचा  (15-22.20 लाख रुपये) समावेश आहे. तसेच मुंबईत आणि गुजरातमध्ये त्याचं आलिशान घर आहे.


मुनव्वर फारुकीला काय बक्षीस मिळालं? (Munawar Faruqui Prize Money Car) 


'बिग बॉस 17'चा विजेता मुनव्वर फारुकीला 50 लाख रुपये मिळाले आहेत. तसेच 'बिग बॉस 17'च्या दिल, दिमाग और दम या थीमवर आधारित एक शानदार ट्रॉफीदेखील मिळाली आहे. रोख रखमेसह एक आलिशान गाडीदेखील त्याला भेट म्हणून मिळाली आहे. मुनव्वर फारुकीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. 'बिग बॉस 17' या कार्यक्रमाचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला आहे. यात मुनव्वर फारुकी विजेता ठरला असून अभिषेक कुमार (Abhishek Kumar) उपविजेता ठरला आहे. मुनव्वरला सर्वाधित मतं मिळाली. 'बिग बॉस 17'चा विजेता ठरलेल्या मुनव्वरला ट्रॉफीसह 50 लाख रुपये आणि आलिशान कार भेट म्हणून मिळाली आहे.


संबंधित बातम्या


Munawar Faruqui Exclusive : 'Bigg Boss 17'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीची एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया;"तुमच्या पाठिंब्यामुळे ट्रॉफी डोंगरीत आली"