Marathi Actor Social Media Post :  'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून अनिरुद्ध या पात्रामुळे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे घराघरांत पोहचले. त्यांच्या या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच मिंलिंद गवळी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची मतं व्यक्त करत असतात. नुकतीच त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर एक खरमरीत पोस्ट केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सोशल मीडियावर पसरल्या जाणाऱ्या खोट्या वृत्तांविषयी देखील भाष्य केलंय. 


निवडणुकांच्या वातावरणात अनेक कलाकार त्यांची मतं व्यक्त करत आहेत. त्यांच्या पोस्टनेही साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता मिलिंद गवळी यांची देखील पोस्ट जोरदार चर्चेत आली आहे. त्यांच्या या पोस्टला त्यांनी डोक्याचा भुगा असं हेडिंग दिलं आहे. या सगळ्यामुळे डोक्याचा भुगा होत असल्याचा मत मिलिंद गवळी यांनी यावेळी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. 


मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत


मिलिंद गवळी यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, “डोक्याचा भुगा” आजच्या तारखेला सगळ्यात फसव काय असेल तर सोशल मीडिया, त्यावर असलेल्या बातम्या, गोष्टी किती खऱ्या किती खोट्या आहेत हे तर परमेश्वरालाच माहित असतील. आता इलेक्शन असल्यामुळे पुढार्‍यांची भाषणांचे क्लिपिंग तर खूपच पसरलेले आहेत. एखादा पुढारी दुसऱ्या एखाद्या पुढार्‍याच्या विरोधात बोलतो अशी क्लिप बघायला मिळते, पण मग प्रश्न पडतो त्यांची युती आहे मग त्या पुढाऱ्याच्या विरोधात का बोलला असेल ? मग नंतर लक्षात येते की त्या पुढार्‍याची ती क्लिप फार जुनी आहे, ज्या वेळेला ते एकमेकांच्या विरोधात होते तेव्हा ची , पण आता मात्र त्यांची युती आहे,आता ते एकमेकांचं कौतुक करता आहेत,
काय खरं काय खोटं हे कळायलाच मार्ग नाही. 


मिलिंद गवळी यांनी पुढे सोशल मीडियावरीलही अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, इंस्टाग्राम आणि फेसबुक किंवा युट्युब च्या क्लिपिंग बघायला सुरुवात केली की त्या संपतच नाहीत, तुमचा अर्धा पाऊण तास कसा निघून गेला ते तुम्हाला कळतच नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे इतके clippings आणि visuals डोळ्यापुढून जात असतात की डोक्याचा भोगाच होतो, बरं इतका वेळ आपण काय बघितलं, काय पाहिलं तर ते काय आपल्या काही लक्षात राहत नसतं,कुठल्यातरी गाण्याची धून किंवा त्या गाण्याची पहिली ओळ मात्र डोक्यात फिरत असते,गुलाबी साडी आणि लाली लाल लाल,किंवा पुष्पा पुष्पा पुष्पा किंवा एखादं जुनं रिमिक्स गाणं जरा देखो सजन बेईमान भवरा कैसे गुणगुणये.


ही बातमी वाचा : 


Kiran Mane : महिलांशी गैरवर्तनाचा आरोप, मालिकेतून बाहेरचा रस्ता, चॅनलविरोधात लढा; किरण मानेंनी केला अनेक गुपितांचा खुलासा