Premachi Goshta Serial Update : माधवीच्या अपघाताला आदित्य कारणीभूत असल्याचे समजल्यानंतर सागर प्रचंड तणावात आहे. एकीकडे आदित्यचा बचाव  करायचा आहे आणि दुसरीकडे जावई-नवरा असल्याचे कर्तव्य पार पाडायचे आहे अशा कैचीत सागर अडकला आहे. आता, सागरसमोर सई की आदित्य असा प्रश्न आला आहे. सागर आता काय करणार, हे प्रेक्षकांना 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत पाहायला मिळणार आहे. 


आपण मुक्ताचे कान भरण्याचे प्रयत्न केले, पण तिने विश्वास ठेवले नसल्याचे  हर्षवर्धन सावनी आणि कार्तिकला सांगतो. त्यावर कार्तिक हा मुक्ताला आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील असे सांगतो. मुक्ताला सरळ करण्यासाठी सागरच मला मदत करेल असे सावनी सांगते. 


आदित्य शाळेतून येतो तेव्हा आजारी असल्याचे दिसतो. त्याचा उतरलेला चेहरा पाहून सावनी चिंतेत पडते. त्याच्यासाठी हर्षवर्धन डॉक्टरांना बोलावतो. आदित्य हा कोणत्या तणावात आहे का असे  डॉक्टर सावनीला विचारतात. त्याच्याशी बोलून तो तणावात काही आहे का हे विचारण्यास सांगतात. सावनी आदित्यसोबत संवाद साधते. त्याला पिकनिकला जाऊयात असे सुचवते. सागर सई देखील येतील असे सांगते. त्यावर आदित्य पप्पा येतील का असे विचारतो. सावनी त्यावर होकारार्थी उत्तर देताना सागर नक्कीच येईल असे सांगते. 


सईसोबत समर कॅम्पला जायचे असल्याने दुसरे कोणतेही कार्यक्रम ठेवायचे नाही असे मुक्ता-सई सागरला सांगतात.  पण, तेवढ्यात सागरला आदित्यचा फोन येतो आणि मला एकटं वाटतंय,  खूप भीती वाटते असे सांगतो. उद्या आपण सगळे बाहेर जाऊयात असे सांगतो. मात्र, सागर भावनेच्या भरात आदित्यला होकार देतो. फोनवर आदित्यशी बोलून झाल्यावर सागर सई आणि मुक्ताचे बोलणं ऐकतो. त्यावर सई पप्पा येणार नाही असे वाटत होते. पण, तुम्ही दोघे माझ्यासोबत येणार याचा आनंद वाटत असल्याचे सांगते.  आता सागर समोर सई की आदित्य असा गहन प्रश्न निर्माण होतो. 


सागर मुक्ताला दोन-तीन दिवस बाहेर जायचे आहे, असे सांगतो. त्यावर मुक्ताला आनंद वाटतो. पण, सागर मी  आदित्य-सावनीसोबत जायचे असल्याचे सांगतो. त्यावर मुक्ताला वाईट वाटते. सईची कशी समजूत घालावी याचा विचार मुक्ताच्या मनात येतो. तर, सागरला आता आपण विचित्र स्थितीत अडकल्याची जाणीव होते. 


दुसऱ्या दिवशी सागर पप्पा आपल्यासोबत येणार नसल्याचे समजताच सई चिडते. त्यावर मुक्ता पप्पाला काम आले असल्याचे सांगते. पण, सई हे खोटं असल्याचे सांगते आणि पप्पा आदित्य दादासोबत जाणार असल्याचे सांगते. सईची नाराजी पाहून मुक्तालाही वाईट वाटते.