Me Honar Superstar Chhote Ustaad : मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या मंचावर 'मराठी भाषा दिन' (Marathi Bhasha Din) साजरा होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो.
'मराठी भाषा दिना'निमित्त आदर्श शिंदेने स्पर्धकांना खास मराठी पुस्तकांची भेट दिली आहे. छोटे उस्ताद आपल्या सुरांनी अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घालत आहेत. मराठी भाषादिनी म्हणजेच 27 फेब्रुवारीच्या विशेष भागात अस्सल मराठी गाणी सादर करत छोटे उस्ताद कुसुमाग्रजांना सुरेल श्रद्धांजली वाहणार आहेत.
'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' या कार्यक्रमाची खासियत म्हणजे पहिल्या भागापासून या मंचावर स्पर्धक मराठी गाणीच सादर करत आहेत. मायबोली मराठी भाषेचा गोडवा जपण्याचा प्रयत्न 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या मंचावर सातत्याने केला जात आहे.
महाराष्ट्रभरातून ऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवड चाचणीतून या कार्यक्रमासाठी स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. 5 ते 14 या वयोगटातील छोट्या उस्तादांना या अनोख्या कार्यक्रमात झळकण्याची संधी मिळाली आहे.
संबंधित बातम्या
Taarak Mehta On Netflix : 'तारक मेहता का छोटा चष्मा' येणार नेटफ्लिक्सवर
'बाई वाडयावर या 2' या गाण्यात मानसी नाईकच्या दिलखेचक अदांनी केलं रसिकांना घायाळ...
Jhund Trailer : बिग बींचा स्वॅग, आकाशचा लफडा.. 'झुंड'चा ट्रेलर लॉंच
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha